शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ११ शेतकऱ्यांचा गौरव

By admin | Updated: July 2, 2015 02:09 IST

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन ...

पालकमंत्र्यांचे आवाहन : जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावागडचिरोली : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन व कृषी जनजागृती सप्ताह शुभारंभाच्या कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी रणजीतकुमार, कृषी विभाग उपसंचालक विजय कोळेकर, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते पडीत जागेवर सुबाभूळची शेती, भातपिकाच्या शेतीसाठी रोवणी यंत्राचा वापर, शेळी व भाजीपाला उत्पादन करणारे तसेच यांत्रिकीकरणाद्वारे भात रोवणी व श्रीपद्धतीने भाताची रोवणी करणाऱ्या पुरूष व महिला शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रंसगी पालकमंत्री आत्राम म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात भरपूर प्रमाणात पाणी आहे. मात्र जिल्ह्याच्या पाणी स्त्रोतातून शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाच्या वतीने विविध शासकीय योजना राबवूनही दुर्गम भागातील शेतकरी दरवर्षी दुष्काळाचा सामना करतो. पुरेशा प्रमाणात सिंचन सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. याकरिता पाच वर्षांचा सिंचन सुविधेचा सूक्ष्म आराखडा तयार करणे गरजेचे आहे व असा आराखडा तयार करण्याच्या कार्यवाहिला राज्याचे मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविली असून येत्या काही महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातही कृषी क्षेत्राच्या विकासाचा व सिंचन सुविधेचा आराखडा तयार होईल, असेही पालकमंत्री आत्राम म्हणाले.सन्मानित झालेल्या आदर्श शेतकऱ्यांचा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी आदर्श घेऊन कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करावी, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जि. प. सीईओ संपदा मेहता यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, संचालन चंद्रकांत ठाकरे यांनी केले तर आभार एस. टी. पठाण यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)कृषी कर्मचाऱ्यांकडून गावागावांत जनजागृती कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ ते ७ जुलैदरम्यान कृषी विभागाचे कर्मचारी १२ ही तालुक्यात गावागावात जाऊन कृषी योजना व धोरणाबाबत जनजागृती करणार आहेत, अशी माहिती डॉ. कुडमुलवार यांनी दिली.या शेतकऱ्यांचा झाला गौरवकृषीदिन कार्यक्रमात पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये चंद्रशेखर रामदास मुरतेली रा. पारडी ता. गडचिरोली, भास्कर श्रीराम वैद्य रा. शिवणी बुज ता. आरमोरी, सुहांगणा हिरालाल प्रधान रा. पिंपळगाव (हलदी) ता. देसाईगंज, खुशाल वासुदेव गुरनुले रा. बेतकाठी ता. कोरची, रेखा कृष्णा गावतुरे रा. बेडगाव घाट ता. कोरची, उदाराम बळीराम क वाडकर रा. नवरगाव ता. कुरखेडा, गजानन भुरसे रा. मेंढाटोला ता. धानोरा, मोरेश्वर गंगाधर चरडे रा. चंदनवडी ता. चामोर्शी, मीना बिचंगा सिडाम रा. मल्लमपल्ली, बंडू चिन्ना लेकामी रा. मल्लमपल्ली ता. एटापल्ली, सिरय्या पेंटा गावडे रा. गरखापेठा ता. सिरोंचा आदींचा समावेश आहे.