लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गृहमंत्रालय भारत सरकारच्या वतीने देशभरातील पोलीस दलातील जवानांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती शौर्यपदकाची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये गडचिरोली जिल्ह्यात काम केलेल्या तीन पोलीस अधिकारी व चार जवानांचा समावेश आहे.पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये गडचिरोलीचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक व यवतमाळचे विद्यमान पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पुंजा मंडलिक, सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे, नाईक पोलीस शिपाई नागसू उसेंडी, पोलीस शिपाई नीलेश मडावी, रमेश आत्राम, बबलू पुंगाडा आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस अधिकारी एम.राजकुमार यांना दुसºयांदा राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
तीन पोलीस अधिकारी व चार जवानांना राष्ट्रपती शौर्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:40 IST
गृहमंत्रालय भारत सरकारच्या वतीने देशभरातील पोलीस दलातील जवानांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती शौर्यपदकाची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली.
तीन पोलीस अधिकारी व चार जवानांना राष्ट्रपती शौर्यपदक
ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनी होणार सन्मान : सर्व गडचिरोलीत सेवा देणारे