शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देसाईगंज व गडचिरोली येथील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे

By admin | Updated: November 16, 2016 02:11 IST

मजुरांची मजुरी आता बँक खात्यातच जमा करण्याचे धोरण शासनाने अवंलबल्याने वन विभागातील भ्रष्टाचारावर फार मोठा अंकूश लागणार आहे.

हजारो मजुरांना लाभ : मजुरी बँक खात्यात होणार जमागडचिरोली : मजुरांची मजुरी आता बँक खात्यातच जमा करण्याचे धोरण शासनाने अवंलबल्याने वन विभागातील भ्रष्टाचारावर फार मोठा अंकूश लागणार आहे.विविध कामांसाठी वन विभागाकडे दर दिवशी शेकडो मजूर कामावर राहतात. मात्र या मजुरांची मजुरी आजपर्यंत रोखीने दिली जात होती. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत होता. २० मजूर कामावर असताना ४० मजूर दाखवून उर्वरित मजुरांचे पैसे वनाधिकारी आपल्या खिशात टाकत होते. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर आता मजुरी बँक खात्यातच जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. जनधन योजनेंतर्गत बहुतांश मजुरांनी बँक खाते उघडले आहेत. रोहयोवर काम करणाऱ्या मजुरांकडेही बँक खाते आहेत. त्यामुळे मजुरांनाही बँक खात्यामध्ये मजुरी जमा होण्यात कोणतीही अडचण नाही. कामाचे संपूर्ण पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. त्याचबरोबर मजुरी मागतेवेळी वनाधिकाऱ्याला शे-पाचशे रूपये देण्याचीही गरज राहिली नाही. राज्यभरातील वन विभागामध्ये दर दिवशी हजारो मजूर काम करतात. या मजुरांच्या मजुरीपोटी दिली जाणारी रक्कम रोखमध्ये दिली जात होती. रोखीच्या व्यवहारांमुळे वन विभागातील कर्मचारी गब्बर बनले होते. शासनाच्या या नवीन निर्णयाचा चांगला फटका वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे ते हादरले आहेत. (नगर प्रतिनिधी)मजुरीवरून दिवाळीपूर्वी उडाला गोंधळमजुरांच्या मजुरीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यातच जमा करण्याबाबतचे पत्र वन विभागाने जिल्हास्तरावरील कार्यालयाला एक महिन्यापूर्वी पाठविले. तेव्हापासून मजुरी बँक खात्यात जमा करण्याचे कडक धोरण अवलंबण्यात येत आहे. दिवाळीच्या पूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील काही मजुरांची मजुरी जमा न झाल्याने आलापल्ली येथील मजुरांनी आंदोलन केले होते. मात्र शासनाच्या या नवीन निर्णयाचा लाभ मजुरांनाच होणार आहे. ही बाब वनाधिकाऱ्यांनी मजुरांना समजावून दिल्यानंतर ते शांत झाले व शासनाच्या निर्णयाचे स्वागतही केले.