शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शैक्षणिक स्थितीचे मुंबईत सादरीकरण

By admin | Updated: June 3, 2016 01:19 IST

एमपीएसपी मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हापर्यायी समन्वयकांची सभा शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

समन्वयकांची सभा : शालेय शिक्षण सचिवांकडून उपक्रमांचे कौतुकभामरागड : एमपीएसपी मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हापर्यायी समन्वयकांची सभा शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्त्व भामरागड तालुक्याचे साधन व्यक्ती चांगदेव सोरते यांनी केले. मागील शैक्षणिक सत्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शैक्षणिक स्थिती अधिक गतीमान झाली. वरिष्ठांच्या कार्य प्रेरणेतुन शिक्षकांनी विपरीत परिस्थितीत जिल्ह्यात एकप्रकारे शैक्षणिक क्रांतीला सुरवात झाली. सर्व शाळा ज्ञानरचनावादी झाल्या. तसेच मोबाईल डिजीटल होऊन शिक्षक तंत्रस्नेही झालेत. ज्ञानरचनावादी पध्दतीने शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी स्वत:हून शिकू लागलेत. शाळा बाह्य मुले शाळेच्या मुख्य प्रवाहात आलीत. विद्यार्थीच्या गुणवत्तेत ७० ते ८० टक्के वाढ झाली. याविषयीचे सविस्तर सादरीकरण चांगदेव सोरते यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील शिक्षण प्रक्रियेत होत असलेला बदल व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ याबद्दल सर्व प्रतिनिधींसह शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनीसुध्दा समाधान व्यक्त करून सोरते यांच्याकडून माहिती जाणून घेतली. पर्यायी शिक्षण अंतर्गत राज्यात हंगामी वसतीगृह योजना, विशेष प्रशिक्षण व निवासी वसतिगृह योजना याविषयी चर्चा करण्यात आली. एकही मूल शाळाबाह्य राहता कामा नये, याकरिता अचूक सर्वेक्षण करा, शिक्षण हमी कार्ड, स्थलांतरीत विद्यार्थी याविषयीचा आढावा व मार्गदर्शन राज्य समन्वयिका प्रज्ञा जोशी यांनी केले. मुले शंभर टक्के शिकू शकतात त्याला शिकवा व प्रगत करा असा विश्वास शालेय शिक्षण सचिव यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केला. नवीन शैक्षणिक सत्रात १०० टक्के गुणवत्तेचा ध्यास घेण्याच ेआवाहन त्यांनी केले.