शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बीएएमएस डॉक्टरांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करा

By admin | Updated: August 1, 2016 01:29 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या रुग्णालयात डॉक्टरांची पदे भरण्याकरिता जाहिरात देऊनही जिल्हाबाहेरील डॉक्टर येण्यास तयार नाही.

पालकमंत्र्यांची सूचना : बैठकीत आरोग्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या रुग्णालयात डॉक्टरांची पदे भरण्याकरिता जाहिरात देऊनही जिल्हाबाहेरील डॉक्टर येण्यास तयार नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. जिल्ह्याच्या रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी बीएएमएस डॉक्टर नियुक्तीकरण्यासाठीच्या नियमात बदल करण्याकरिता प्रस्ताव तत्काळ सादर कराव्या, अशा सूचना आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची सभा पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी बैठकीला आ. क्रिष्णा गजबे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, डॉ. अप्पलवार, डॉ. कुंभारे आदी उपस्थित होते. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, गरीब प्रवर्गातील लोकांसाठी असलेल्या आरोग्य योजना, संबंधित संस्था करतात किंवा नाही, याचा आढावा घेण्याचे काम सदर समिती करीत असते. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचा कायापालट करणे, वैद्यकीय अधिकारी कंत्राटी स्वरूपात उपलब्ध करणे, आरोग्य सुविधेसाठी निधीची मागणी आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी) कंत्राटी पद्धतीवर स्वच्छता कर्मचारी नेमा दवाखान्यात पुरेसा आहार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी नायक यांनी बीपीएलच्या दरात धान्य पुरवठा करून देण्याचे बैठकीत मान्य केले. प्रत्येक आरोग्य केंद्रात स्वच्छता राखण्याची आवश्यकता आहे. मात्र केंद्रात स्वच्छक पदाला मान्यता नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने स्वच्छता कर्मचारी नेमून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.