शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

औषध वितरणासाठी कोकडी सज्ज

By admin | Updated: June 8, 2017 01:46 IST

तालुक्यातील कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या मागील ३५ वर्षापासून अविरत सुरू असलेल्या उपक्रमातून दिल्या जाणाऱ्या

आज लाखावर लोक येणार : दमा आजारावर देणार मोफत औषधी लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : तालुक्यातील कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या मागील ३५ वर्षापासून अविरत सुरू असलेल्या उपक्रमातून दिल्या जाणाऱ्या नि:शुल्क दमा औषधीचे वितरण ८ जून रोजी गुरूवारला मृग नक्षत्राच्या पर्वावर होणार आहे. वैद्यराज प्रल्हाद कावळे हे विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दमा रूग्णांना मासोळीतून औषध देणार आहेत. सदर औषध घेण्यासाठी दमा रूग्णांची कोकडी येथे प्रचंड गर्दी होणार आहे. मृग नक्षत्राच्या दिवशी सकाळी औषध वितरणाला सुरुवात होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत औषधी वितरण होईल. याचा लाभ घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दमा रुग्णांचे जत्थे कोकडी येथे डेरेदाखल झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे सेवाभावी वृत्तीतून मागील ३५ वर्षांपासून नि:शुल्क औषधी वितरण करीत आहेत. देशासह लगतच्या नेपाळ, बांग्लादेशातून येणाऱ्या दमा रुग्णांना झालेल्या फायद्याचा अनुभव लक्षात घेता औषधीचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी हजारोंच्या संख्येत भर पडत आहे. यामुळे कोकडी या गावाला कुंभमेळ्याचे स्वरुप प्राप्त होत असते. एकूणच दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता औषधीवाटपा दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये, यास्तव तालुक्यातील सेवाभावी संस्था,दानशूर व्यक्ती तद्वतच समस्त गावकऱ्यांच्या वतीने आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. देसाईगंज ते कोकडी अशा ८ किमी प्रवासादरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये करिता एस.टी.बसेस, आॅटो, खाजगी ट्रॅव्हल्सची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. लांबवरून आलेल्या रुग्णांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शाकाहारी रुग्णांना केळीच्या माध्यमातून तर मांसाहारी दमा रुग्णांना गणी भुरभुसा या बारीक मासोळ्यांतून आयुर्वेदिक औषध दिली जाते. ही औषध सतत तीन वर्षातून एकदाच सेवन केल्याने रुग्णांना कायम स्वरुपी लाभ मिळत असल्याचे सांगण्यात येत असल्याने या औषधीचा लाभ घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यासह विदेशी रुग्णही कोकडीकडे वळू लागल्याने दरवर्षी येणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मासोळीतून औषध देताना मासोळ्यांचा तुटवडा जाणवू नये याकरिता स्थानिक भोई, ढिवर, केवट समाज बांधवांसह परिसरातील बांधवांचे विषेश सहकार्य घेण्यात येते. उन्हाचा तडाखा लक्षात घेता तालुका आरोग्य विभागाच्या वतीने अकस्मात सेवा तत्पर ठेवण्यात आली असून पोलीस यंत्रणाही सुसज्ज आहे.