शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीसाठी कृती आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:03 IST

दारु व तंबाखुमुक्तीसाठी करण्याबाबत प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करुन १५ दिवसांत सादर करावा आणि त्यानुसार काम सुरु करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी येथे दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : कार्यालय प्रमुखांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारु व तंबाखुमुक्तीसाठी करण्याबाबत प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करुन १५ दिवसांत सादर करावा आणि त्यानुसार काम सुरु करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी येथे दिले.जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेला सर्चचे संचालक डॉ.अभय बंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, डीएचओ शशिकांत शंभरकर, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी आदी उपस्थित होते.जिल्हयात दरवर्षी २ हजार ५०० लोक तंबाखुयुक्त पदार्थांच्या व्यसनी जातात आणि यामुळे दरवर्षी १३ हजार नागरिक तंबाखुमूळे दारिद्र्यात लोटले जात आहेत. जिल्ह्यात तंबाखुयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे दरवर्षी ७३ कोटी रुपये खर्च होत असल्याचा निष्कर्ष निघालेला आहे. अगदी कमी वयात तंबाखूचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. मुखकर्करोग प्रतिबंधासाठी तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन बंद करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी केले.तंबाखू व दारुमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत सहभागी व अंमलबजावणी करणाºया कार्यालयांनी प्रथम व्यसनमुक्त कार्यालय झाल्याचे जाहीर करुन तसा फलक दर्शनी भागावर लावावा, अशा सूचना यापुर्वीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व शासकीय कार्यालय प्रमुख व शाखा प्रमुख यांनी पुढील १५ दिवसात दारु व तंबाखू नियंत्रणाबाबत कृती कार्यक्रम आराखडा तयार करुन सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले.याप्रसंगी डॉ.अभय बंग म्हणाले, अन्न व औषध विभागाने पोलिसांना सहकार्य करुन प्रथम तालुक्याच्या ठिकाणी कडक कारवाई करावी. या कारवाईचा परिणाम आपोआपच जिल्हाभरातील गावांमध्ये पोहचायला वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे प्रथम स्वत:चे कार्यालय, समाज या व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढा असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.दिवाळीपासून मुक्तीपथांतर्गत तालुक्याच्या ठिकाणापासून परिवर्तन कार्यक्रमांची सुरुवात करीत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्तीच्या या अभियानात ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग महत्वाची भुमिका बजावू शकेल, यासाठीही प्रयत्न करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी