शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती व स्तनदा माता काेराेना लसीकरणापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

गडचिराेली : सुरूवातीच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे काेराेना लसीकरण सुरू करण्यात आले. आता १ मेपासून १८ ते ४४ वर्षे ...

गडचिराेली : सुरूवातीच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे काेराेना लसीकरण सुरू करण्यात आले. आता १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांसाठी लसीकरण माेहीम सुरू करण्यात आली. मात्र, गराेदर, स्तनदा मातांच्या लसीकरणाबाबत शासनाकडून अद्याप कुठल्याही सूचना आल्या नाहीत. तसेच मासिक पाळीदरम्यान महिलांनी लस घ्यावी का? हा प्रश्नही कायम आहे. एकूणच लसीकरणाबाबत गराेदर, स्तनदा मातांमध्ये संभ्रमावस्था आहे.

काेराेना लस घेणे आवश्यक आहे. याबाबत प्रशासन जनजागृती करीत आहे. आत्तापर्यंत जिल्हाभरात ९० हजारवर नागरिकांनी काेराेनाची लस घेतली. यातील बहुतांश लाेकांच्या प्रकृतीवर काेणताही विपरित परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने काेराेनाची लस आवर्जुन घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. दरम्यान, लस घेण्यासाठी महिला पुरूषांच्या तुलनेत मागे असल्याचे दिसते. त्यांच्यातील गैरसमज दूर हाेणे गरजेचे आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : सुरूवातीच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे काेराेना लसीकरण सुरू करण्यात आले. आता १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांसाठी लसीकरण माेहीम सुरू करण्यात आली. मात्र, गराेदर, स्तनदा मातांच्या लसीकरणाबाबत शासनाकडून अद्याप कुठल्याही सूचना आल्या नाहीत. तसेच मासिक पाळीदरम्यान महिलांनी लस घ्यावी का? हा प्रश्नही कायम आहे. एकूणच लसीकरणाबाबत गराेदर, स्तनदा मातांमध्ये संभ्रमावस्था आहे.

काेराेना लस घेणे आवश्यक आहे. याबाबत प्रशासन जनजागृती करीत आहे. आत्तापर्यंत जिल्हाभरात ९० हजारवर नागरिकांनी काेराेनाची लस घेतली. यातील बहुतांश लाेकांच्या प्रकृतीवर काेणताही विपरित परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने काेराेनाची लस आवर्जुन घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. दरम्यान लस घेण्यासाठी महिला पुरूषांच्या तुलनेत मागे असल्याचे दिसते. त्यांच्यातील गैरसमज दूर हाेणे गरजेचे आहे.

बाॅक्स .....

स्त्री राेगतज्ज्ञ काय म्हणतात? स्त्री राेगतज्ज्ञ काय म्हणतात?

गर्भवती, स्तनदा मातांना काेराेनाची लस देण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून कुठल्याही सूचना नाहीत. लसीकरणाबाबत शासनाची मार्गदर्शक तत्वे सतत बदलत असून, दरराेज नवीन परिपत्रके निघत आहेत. बाळांना धाेका हाेऊ नये, यासाठी गर्भवती मातांना काेराेनाची लस देणे अद्यापही सुरू झाले नाही. महिला रूग्णालयाच्या केंद्रावर एकाही गर्भवती महिलेला लस देण्यात आली नाही.

- डाॅ. दीपचंद साेयाम, स्त्रीराेगतज्ज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक महिला रुग्णालय, गडचिराेली

काेट ......

मासिक पाळीतही महिलांना काेराेनाची लस घेता येते. गर्भवती व स्तनदा मातांसाठी Pfizer या कंपनीची लस उत्तम आहे. लसीकरण हाच काेराेनापासून बचाव करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. नागरिक व महिलांनी आवर्जुन काेराेनाची लस घ्यावी. याशिवाय सतत मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. काेराेना महामारीच्या काळात महिलांनी आपल्या आराेग्याबाबत विशेष दक्ष राहावे. स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.

- डाॅ. स्नेहा जयंत पर्वते, स्त्रीराेगतज्ज्ञ, गडचिराेली

बाॅक्स .......

लसीकरणाची सद्यस्थिती

-गडचिराेली जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ९२ हजार ८३९ नागरिकांचे काेराेना लसीकरण झाले. यामध्ये ७३ हजार ७७८ जणांनी पहिला डाेस, तर १९ हजार ६१ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला आहे.

- ४५ ते ५९ वर्षे वयाेगटातील आत्तापर्यंत एकूण २४ हजार ९०३ नागरिकांनी काेराेना लसीकरणाचा पहिला डाेस घेतला आहे, तर १ हजार ७४ जणांनी दुसरा डाेस घेतला आहे.

-६० वर्षांवरील २ हजार २४२ जणांनी पहिला डाेस, तर २ हजार ८८३ जणांनी दुसरा डाेस घेतला आहे.

-१८ ते ४४ वर्षे वयाेगटातील जिल्ह्यातील एकूण ८४५ जणांनी पहिला डाेस घेतला. लसीकरणाची सद्यस्थिती

गडचिराेली जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ९२ हजार ८३९ नागरिकांचे काेराेना लसीकरण झाले. यामध्ये ७३ हजार ७७८ जणांनी पहिला डाेस, तर १९ हजार ६१ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला आहे.

४५ ते ५९ वर्षे वयाेगटातील आत्तापर्यंत एकूण २४ हजार ९०३ नागरिकांनी काेराेना लसीकरणाचा पहिला डाेस घेतला आहे, तर १ हजार ७४ जणांनी दुसरा डाेस घेतला आहे.

६० वर्षांवरील २ हजार २४२ जणांनी पहिला डाेस, तर २ हजार ८८३ जणांनी दुसरा डाेस घेतला आहे.

१८ ते ४४ वर्षे वयाेगटातील जिल्ह्यातील एकूण ८४५ जणांनी पहिला डाेस घेतला.