शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार

By admin | Updated: September 24, 2016 03:02 IST

गडचिरोलीमध्ये उद्योगासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, या भूमिकेतून उद्योगाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण प्राधान्य देऊ,

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक; उद्योजकांनी मांडल्या समस्या गडचिरोली : गडचिरोलीमध्ये उद्योगासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, या भूमिकेतून उद्योगाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा शुक्रवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एम. एन. परिहार, स्माल स्केल इंडस्ट्रिजचे जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे, उद्योग समितीचे अध्यक्ष दीपक सरोदे, उद्योजक संघटनेचे सचिव मिलिंद डोंगरे, अतुल बोमनवार, निकेतन गद्देवार, अकबर जीवानी, अझिमा जीवानी आदी उपस्थित होते. उद्योगास विनाखंड आणि विशिष्ट दाबासह वीज पुरवठा आवश्यक असतो. मात्र तसा वीज पुरवठा होत नाही. ही उद्योजकांची मुख्य समस्या आहे. ही समस्या सोडवावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. वीज वितरण कंपनीने यासाठी स्वतंत्र अधिकारी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या. जिल्ह्यातील उद्योगात स्थानिकांना रोजगार अधिक मिळावा, यासाठी पर्यवेक्षीय पदांपैकी ५० टक्के आणि त्याखालील ८० टक्के स्थानिक आहेत, अशी माहिती उद्योजकांनी दिली. पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत जिल्ह्यास २२ लाखांचे उद्दिष्ट प्राप्त आहे. यासाठी ४० अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच सुधारित बिज भांडवल योजनेत १८ लाख ३० हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी २ लाख ६६ हजार रूपयांचे वाटप पूर्ण झाले आहे, अशी माहिती समितीला देण्यात आली.उद्योगांनी स्वत:ची नोंदणी व्यावसायिक प्रशिक्षण भागिदार अर्जात व्हीटीपी म्हणून नोंदणी करून घ्यावी, अशा भागिदारांना कौशल्य प्रशिक्षणासाठी पूर्ण खर्च शासन देते. यातील काही जणांना तर नंतर उद्योग सामावून घेऊ शकतात. याबाबत उद्योजकांनी सकारात्मक विचार करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नायक यांनी केले. यावेळी उद्योजकांच्या अडचणीही जाणून घेतल्या. (नगर प्रतिनिधी)