शासनाकडे साकडे : अशोक नेते यांची मागणीगडचिरोली : विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तिनही जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेले धानपीक पूर्णत: नष्ट झाले आहे. तसेच पावसामुळे शेतकऱ्यांचे रोवणीचे कामे खोळंबली असून शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे. त्यामुळे हे तिनही जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित करून शासनाने शेतीचे सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी शासनाकडे केली आहे.सरासरी ३० टक्के पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७ टक्के पेरणी झालेली होती. मात्र पावसाने दगा दिल्याने पेरणी केलेले पऱ्हे पूर्णत: सुकलेले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस आल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी सुध्दा जिल्हा प्रशासनाकडून अजुनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बि-बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झालेला आहे. शासनाने गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तिनही जिल्ह्याचे जिल्हा प्रशासनामार्फत शेतीचे सर्वेक्षण करून नुकसानीची पाहणी करावी व शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा. तसेच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सवलतीच्या दरात बि-बियाणे व खते उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच तिनही जिल्हे दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी शासनाकडे केलेली आहे.
पूर्व विदर्भ दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Updated: July 14, 2014 02:05 IST