शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या भावाच्या अंत्यदर्शनानंतर लहान्याने सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:31 IST

नियतीचा डाव कुणाला चुकविता आला नाही. तसेच मृत्यू कुणाला चुकतही नाही. जन्मलेल्या प्रत्येक जीवाचा अंत होणार, हे शाश्वत सत्य आहे. पण काळाने अनपेक्षितपणे गाठले तर त्याचे जाणे अनेकांना चटका लागून जाते. अशीच काहीशी घटना मोहझरी गावात घडली. मोठ्या भावाचे अंत्यदर्शन घेऊन आलेल्या लहान भावानेही त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने मोहझरी गावावर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देमोहझरीतील घटना : नियतीच्या खेळाने मोहझरी गाव झाले सुन्न

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : नियतीचा डाव कुणाला चुकविता आला नाही. तसेच मृत्यू कुणाला चुकतही नाही. जन्मलेल्या प्रत्येक जीवाचा अंत होणार, हे शाश्वत सत्य आहे. पण काळाने अनपेक्षितपणे गाठले तर त्याचे जाणे अनेकांना चटका लागून जाते. अशीच काहीशी घटना मोहझरी गावात घडली. मोठ्या भावाचे अंत्यदर्शन घेऊन आलेल्या लहान भावानेही त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने मोहझरी गावावर शोककळा पसरली आहे.वैरागडपासून पाच किमी अंतरावर मोहझरी हे गाव आहे. २ जूनच्या रात्री १२.३० वाजता मधुमेहाच्या आजाराने कालिदास भिवा लोणबले (५५) याचा मृत्यू झाला. मोठ्या भावाच्या मृत्यूची बातमी कळताच गावातच राहणाऱ्या लहान भाऊ तुळशीदास भिवा लोणबले (५०) याने आपल्या भावाच्या घरी जाऊन अंतिम दर्शन घेतले. पोटाच्या आजाराने त्रस्त असल्याने तुळशीदास हा आराम करण्यासाठी घरी आला. पहाटे ५ वाजतापासून तुळशीदासचा आजार वाढला आणि २ जूनला सकाळी ६ वाजता तुळशीदासची प्राणज्योत मालवली. लोणबले बंधूंना मोठी मुले आहेत. ही मुले आता कमाईला लागल्यामुळे दोन्ही भावांच्या कुटुंबातील सदस्यांना आधार मिळेल. परंतू घरातील ज्येष्ठ सदस्य कायमचा निघून गेल्याने त्याची हुरहूर कायम राहणार आहे. विशेष म्हणजे कालीदास, तुळशीदाम या बांधवांच्या निधनानंतर कार्तिक कोटरंगे या युवकाचाही अचानक मृत्यू झाला. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात या तिघांचाही सक्रीय सहभाग असायचा. अवघ्या २४ तासात या तिघांवर काळाने झडप घातल्याने मोहझरी गावात शोककळा पसरली आहे.कार्तिकच्या मृत्यूने हळहळले गावलोणबले बांधवांचा मृत्यू झाला त्या दिवशी २४ तासाच्या आत, म्हणजे २ जून रोजी रात्री ९ वाजता कर्करोगाच्या आजाराने कार्तिक कानू कोटरंगे याचा मृत्यू झाला. दोन भावांचा अंत्यविधी आटोपून आलेल्या गावकऱ्यांना कार्तिक कोटरंगे (३४) याच्या मृत्यूची बातमी रात्री ९ वाजता कळली. या बातमीने गावकऱ्यांना चटका बसला. कार्तिक हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा होता. प्रामाणिक व कष्टाळू असलेला कार्तिक हा गावातील एका राईस मीलमध्ये दिवानजी म्हणून काम करीत होता. त्याच्या घरात म्हातारे वडील, पत्नी, दोन मुले आहेत. या सर्वांची जबाबदारी कार्तिकवर होती. कार्तिकचे वडील गावातील हनुमान मंदिराचे पुजारी म्हणून काम करीत आहेत. परंतू घरात कर्ता पुरूष असलेल्या कार्तिकच्या अकाली मृत्यूने त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.