शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पं.स. पोटनिवडणुकीत भाजप विजयी

By admin | Updated: July 1, 2014 23:29 IST

चामोर्शी तालुक्यातील घोट पंचायत समिती गणाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मंदा परशुराम दुधबावरे या ६६० मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपचा गड कायम राखण्यात

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील घोट पंचायत समिती गणाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मंदा परशुराम दुधबावरे या ६६० मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपचा गड कायम राखण्यात दुधबावरे यांनी यश मिळविले आहे.पं.स. सदस्य छायाताई वासेकर यांच्या निधनामुळे घोट पंचायत समिती गणाची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्यावतीने मंदा परशुराम दुधबावरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून अश्वीनी मधुकर वडेट्टीवार तर युवाशक्ती आघाडीकडून सुरेखा किशोर वैरागडे या रिंगणात होत्या. भाजपच्या मंदा दुधबावरे यांना १ हजार ८७४, काँग्रेसच्या अश्वीनी वडेट्टीवार यांना १ हजार १६९ तर युवाशक्ती आघाडीच्या सुरेखा वैरागडे यांना १ हजार २१४ मते मिळाली. या निवडणुकीत भाजपच्या दुधबावरे यांनी युवाशक्तीच्या वैरागडे यांचा ६६० मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिल्या. काँग्रेसच्या उमेदवारासाठी आमदार डॉ. उसेंडी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपतर्फे प्रचाराची धूरा रामेश्वर सेलुकर, प्रकाश गेडाम, हेमंत दुधबावरे, विलास गण्यारपवार, अनुप अंध्येयंकीवार, केतन गण्यारपवार, रमेश कन्नाके, अशोक पोरेड्डीवार, स्वप्नील वरघंटे, जयराम चलाख, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, डॉ. देवराव होळी, भारती उपाध्ये, ढिवरू बारसागडे यांनी प्रचाराची धूरा सांभाळून पक्षाला यश मिळवून दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी एम. देवेंद्रसिंह, सहाय्यक निवडणूक अधिकारी एस. टी. खंडारे, नायब तहसीलदार (निवडणूक) चडगुलवार यांनी काम पाहिले. आज चामोर्शी तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली. विजयी उमेदवाराला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)