शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विविध समस्यांवर गाजली पं.स. आमसभा

By admin | Updated: April 16, 2017 00:35 IST

जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा अभाव, जनतेच्या कामात प्रशासकीय दिरंगाई, डिजिटल शाळेचे विद्युत बिल आदीसह विविध समस्यांवर धानोरा पंचायत समितीची आमसभा गाजली.

बीडीओंवर कारवाईची मागणी : खंडित वीजपुरवठा, पाणीटंचाई, रस्ते आदी मुद्यांवर चर्चाधानोरा : जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा अभाव, जनतेच्या कामात प्रशासकीय दिरंगाई, डिजिटल शाळेचे विद्युत बिल आदीसह विविध समस्यांवर धानोरा पंचायत समितीची आमसभा गाजली. आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी धानोरा येथील पंचायत समिती परिसरात आमसभा पार पडली. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, पं.स. सभापती अजमन राऊत, उपसभापती अनुसया कोरेटी, जि.प. सदस्य राजू जीवानी, श्रीनिवास दुलमवार, लता पुंघाटे, शशिकांत साळवे, साईनाथ साळवे, गोपाल उईके, संजय कुंडू, ताराबाई कोटांगले, तहसीलदार गणवीर, संवर्ग विकास अधिकारी सपाटे, पं.स. सदस्य मैनाबाई कोवाची, महागू वाटगुरे, विलास गावंडे आदी उपस्थित होते. धानोराच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतला नाही. जयंती कार्यक्रमासाठी पं.स. सभापती पाचारण केले नाही, अशी तक्रार सभापती अजमन राऊत यांनी आमसभेत केली. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय तसेच गणवेशची व्यवस्था करण्यात येईल, असे जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी सांगितले. कक्ष अधीक्षक टेंभुर्णे यांनी आमदार क्रिष्णा गजबे यांनी मागितलेली माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात येईल, असे आमदार डॉ. होळी यांनी सभेत सांगितले. जनतेची कामे करण्यास हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची परवा केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. हातपंप दुरूस्तीसाठी नवीन वाहन देण्यात यावे, ग्रामीण रूग्णालयात सोनोग्राफीची व्यवस्था करण्यात यावी, रूग्णवाहिका देण्यात यावी, डिजिटल शाळेला विद्युत बिल भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पेंढरी येथील ३३ केव्ही पॉवर हाऊसचे काम तीन महिन्यात पूर्ण कर, असे निर्देश आमदार महोदयांनी दिले. सालेभट्टी येथे सात विहिरींचे खोदकाम करण्यात आले. मात्र पाणी लागले नाही. मुंगनेर गावात सात दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत आहे. धानोरा तालुक्यात विविध समस्या असल्याने संवर्ग विकास अधिकारी सपाटे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी सरपंच सुगंधा उईके यांनी आमसभेत केली. शाळेतील विद्यार्थ्यांना गोंडी भाषेत शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सुनिल कुमरे यांनी केली. लेखा येथील पाणी पुरवठा योजना तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या आहे. जांगदा, गोडलवाहीसह ग्रामीण भागातील रस्ते तयार करावेत, अशी मागणी आमसभेत करण्यात आली. सभेचे संचालन विस्तार अधिकारी सावसाकडे तर आभार सहायक बीडीओ निलेश वानखेडे यांनी केले.