शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोहोचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 02:47 IST

तालुक्यातील मुरखळा माल येथील काही नागरिकांनी गावापासून एक किमी अंतरावर घरे बांधून वस्ती करण्यास सुरूवात केली.

२२ वीज खांब व डीपी लावली : मुरखळा माल येथील नागरिकांमध्ये आनंदोत्सव लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : तालुक्यातील मुरखळा माल येथील काही नागरिकांनी गावापासून एक किमी अंतरावर घरे बांधून वस्ती करण्यास सुरूवात केली. मागील १७ वर्षांपासून वीज पुरवठा मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र त्याला यश येत नव्हते. जि.प. सदस्य कविता प्रमोद भगत यांच्या प्रयत्नानंतर मात्र एक महिन्यात या ठिकाणी वीज खांब पोहोचले असून वीज पुरवठाही २३ जुलैपासून सुरू झाला आहे. मुरखळा माल येथील विनायक शेंडे, भैय्याजी नैताम, वासुदेव बुरे, गणपत वासेकर, सुभाष नैताम, संदीप नैताम यांनी गावापासून एक किमी अंतरावर २००० साली घर बांधून राहण्यास सुरूवात केली. वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी पाचही कुटुंबांनी लोकप्रतिनिधी, वीज विभाग ग्रामपंचायत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र त्यांना वीज खांब टाकून वीज पुरवठा उपलब्ध करून दिला नाही. वीज नसल्याने सदर कुटुंब सोयीसुविधांपासून वंचित राहिले होते. जिल्हा परिषद सदस्य कविता प्रमोद भगत व माजी पं.स. सदस्य प्रमोद भगत यांनी या कुटुंबांना वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वीज वितरण कंपनीचे अभियंता रणदिवे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर २२ वीज खांब, एक डीपी मंजूर केली. एक महिन्यात खांब गाडण्याचे व डीपी लावण्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर २३ जुलै रोजी जि.प. सदस्य कविता भगत यांच्या हस्ते कळ दाबून विजेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्यांदाच घरापर्यंत वीज पोहोचल्याने कुटुंबांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी रवी धोटे, दिगांबर धानोरकर, अरूण बुरे, किर्ती सोमनकर उपस्थित होते.