शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोटगल येथील वीज पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:15 IST

कोटगल येथील २२० केव्ही ईएचव्ही उपकेंद्रातील एका पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीला गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, धानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात नाईलाजाने सक्तीचे भारनियमन करावे लागत आहे.

ठळक मुद्देगावांमध्ये भारनियमन : सहकार्य करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोटगल येथील २२० केव्ही ईएचव्ही उपकेंद्रातील एका पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीला गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, धानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात नाईलाजाने सक्तीचे भारनियमन करावे लागत आहे.कोटगल वीज उपकेंद्रातून गडचिरोली, आरमोरी, धानोरा उपविभागाला विजेचा पुरवठा केला जातो. या ठिकाणी २५ एमव्हीएचे दोन पॉवर ट्रान्सफार्मर बसविले आहेत. २८ जुलै रोजी क्रमांक २ च्या पॉवर ट्रान्सफार्मरच्या केबलमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे संपूर्ण वीज भार ट्रान्सफार्मर क्रमांक १ वर टाकण्यात आला आहे. एकाच ट्रान्सफार्मरवरून वीज पुरवठा होत असल्याने कधीकधी या ट्रान्सफार्मरवरील लोड वाढते. त्यामुळे आरमोरी, धानोरा, कुरखेडा, गडचिरोली तालुक्यातील ग्रामीण भागात सक्तीचे भारनियमन करावे लागत आहे. पावसाने उसंत घेतल्याने गरमीत वाढ झाली आहे. अशातच भारनियमन केले जात असल्याने नागरिकांना मनस्ताप होणे सहाजिक आहे. मात्र भारनियमन केल्याशिवाय वीज कंपनीलाही दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बिघाड निर्माण झाला तेव्हापासूनच बिघाड दुरूस्त करण्याच्या कामाला लागले आहेत. मात्र बिघाड मोठा असल्याने आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत भारनियमन करावेच लागणार आहे. भारनियमन करण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांचा काहीच दोष नाही. गडचिरोली येथूनच भारनियमन केले जात आहे. बिघाड दुरूस्त होताच वीज पुरवठा नियमित होईल. ग्राहकांनी महावितरणची अडचण लक्षात घेऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी केले आहे.