शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांपासून वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:08 IST

तालुक्यातील बेज्जूरपल्ली येथील विद्युत पुरवठा मागील १० दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देबेजूरपल्ली येथील समस्या : महावितरण कंपनीचे दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतसिरोंचा : तालुक्यातील बेज्जूरपल्ली येथील विद्युत पुरवठा मागील १० दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.बेज्जूरपल्ली हे गाव सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर आहे. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा उपकेंद्रातून वीज पुरवठा होत आहे. सदर अंतर अधिक असल्याने बेज्जूरपल्ली गावात सिरोंचा तालुक्यातून विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी अनेकदा महावितरणकडे करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. जिमलगट्टा येथून विद्युत पुरवठा होत असल्याने वारंवार बिघाड निर्माण होत आहे. एकदा बिघाड निर्माण झाल्यानंतर आठ ते दहा अथवा पंधरा दिवसांपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. विशेष म्हणजे सदर गाव दुर्गम भागात असल्याने अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष होते.अनेकदा विद्युत पुरवठा एकदा खंडित झाल्यास सुरळीत व्हायला १५ ते २० दिवस लागतात. बेजूरपल्ली या गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही. आरोग्य, शिक्षण, पाणी या समस्या येथे आहेत. यातच पुन्हा अनियमित वीज पुरवठ्याची समस्या आहे. त्यामुळे येथील नागरिक समस्यांनी त्रस्त आहेत. बेजूरपल्ली येथील लोकसंख्या ८०० च्या आसपास आहे. गावातील नागरिकांना विविध कामे करावी लागतात. याकरिता वीज आवश्यक असते. परंतु वीज समस्या वेळेवर सुटत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील वीज समस्येकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.बेज्जूरपल्ली हे गाव सिरोंचा तालुक्यातील आहे. मात्र येथे अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा वीज उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केला जातो. सदर अंतर अत्यंत लांब होत असल्याने अनेकदा बिघाड निर्माण होतो. त्यामुळे बेजूरपल्ली येथे सिरोंचा तालुक्यातून वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती उप कार्यकारी अभियंता चंद्रशेखर सडमाके यांनी माध्यमांना दिली.कव्हरेजचीही समस्यासिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरातही वीज व कव्हरेजची समस्या आहे. याशिवाय या भागात इंटरनेट सेवा अत्यंत मंद गतीने चालत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.