शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत जिल्ह्याची गरिबी दूर होऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:55 IST

हा जिल्हा श्रीमंत असला तरी माणसं गरीब आहेत. ही स्थिती बदलू शकते. पण डाव्या विचारसरणीच्या लोकांमुळे जिल्ह्याच्या विकासात अडथळे आले आहेत.

ठळक मुद्देगडकरींचा आशावाद : विकासाच्या आड येणाऱ्या गोष्टी बाजूला सारून अनुकूलता वाढवा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हा जिल्हा श्रीमंत असला तरी माणसं गरीब आहेत. ही स्थिती बदलू शकते. पण डाव्या विचारसरणीच्या लोकांमुळे जिल्ह्याच्या विकासात अडथळे आले आहेत. जिल्ह्यातील गरिबी, भूकबळी, बेरोजगारी दूर करायची असेल तर डाव्या विचारणीला बाजूला सारून विकासात्मकदृष्टीने उद्योगाला चालना द्या. त्यासाठी लागणाºया बाबी अनुकूल करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.गोंडवाना विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार तर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर होते. याशिवाय प्र-कुलगुरू डॉ.चंद्रशेखर भुसारी, प्रभारी कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, राज्यपालांचे प्रतिनिधी टी.डी.मायी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. कोकोडे, अधिष्ठाता डॉ. आर. पी. हिंगोले, डॉ. एस. एस. कावळे, डॉ. एस. एम. साकुरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी गडकरी म्हणाले, या जिल्ह्यात मोठी खनिज संपत्ती आहे. पण त्याचा योग्य वापर करण्यासाठी जिल्ह्यात बाहेरील मोठे गुंतवणूकदार आले पाहीजे. ते येण्यासाठी सुरक्षित वातावरणासोबतच वीज, पाणी, दळणवळणाची साधनं असावी लागतात. हे सर्व मिळाल्यास ५० हजार लोकांना येथे रोजगार मिळू शकतो, असे ते म्हणाले.केंद्र सरकारने देशातील सर्वात मागास असलेल्या ११५ जिल्ह्यांची यादी तयार केली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे. या जिल्ह्यांचे मागासलेपण दूर करण्यासाठी काय केले पाहीजे याचा विचार केला जात आहे. गावातील पाणी गावातच मिळायला पाहीजे, शेतातील पाणी शेतातच मिळायला पाहीजे, त्याप्रमाणे गावातल्या मुलाला गावातच रोजगार मिळायला पाहीजे. पण ८० टक्के शेती करणारे लोक ६५ टक्क्यांवर आले आहेत. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी सिंचन क्षेत्र वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यात वनकायद्याच्या अडचणी आहेत. पण जिल्ह्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर ‘ब्रिज कम बंधारे’ बांधण्यास प्राधान्य दिले जाईल. त्यातून शेतीला फायदा होईल असे गडकरी म्हणाले.प्रास्ताविकात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर यांनी विद्यापीठाच्या विकासाची सद्यस्थिती व प्रस्तावित कामे मांडली. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रांसाठी नॅशनल अ‍ॅकेडमिक डिपॉझीटरी मुंबई यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. आता हे विद्यार्थी आपल्या गुणपत्रिकांची, पदवींची पडताळणी जगात कुठूनही करू शकतील. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची, पैशाची बचत होईल.विद्यापीठाच्या माहिती केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला असून मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असल्याचे कुलगुरू यांनी भाषणात सांगितले.गोदावरी-वैनगंगेत जलमार्गाचे स्वप्नजिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरील, वैनगंगा या नद्यांमधून जलमार्ग सुरू करण्याचे आपले स्वप्न असल्याचे गडकरी म्हणाले. यामुळे विदर्भातील कापूस जलमार्गाने विशाखापटनमला जाऊ शकेल. भविष्यात जलवाहतूक, सी-प्लेन यासारखे नवीन प्रकल्प हाती घेण्याचे सूतोवाच त्यांनी केले.४गोदावरी नदीप्रमाणेच प्राणहिता आणि इंद्रावती नदीवरही पूल तयार केले जाईल, अशी ग्वाही गडकरींनी दिली.यांना मिळाली आचार्य पदवीविद्या संभाशिव महाजन -प्राणिशास्त्र, रूपेश अमृतराव हिवरकर- गणित, गणेश विश्वास जोशी-गणित, अश्विनी अविनाश कुलकर्णी-गणित, अंजली चंद्रकांत पाठक -गणित, डॉ. गुलामफारूक नुरमोहम्मद सुर्या- अभियांत्रिकी, अमर लालमन शेलेकेर-प्राणिशास्त्र, प्रविण रामदास क्षिरसागर -अभियांत्रिकी, युवराज गजानन बोधे-सुक्ष्मजीवशास्त्र, सुप्रीया सुनिल वनकर-सुक्ष्मजीवशास्त्र, अविनाश रामचंद्र गौरकार-रसायनशास्त्र, रोशन देविदास नासरे-रसायनशास्त्र, छगन दादाजी मुंगमोडे-भौतिकशास्त्र, गौरव रमेश निंबार्ते- रसायनशास्त्र, कविता श्रीहरी रायपुरकर- पर्यावरणशास्त्र, राहुल क्रिष्णा कांबळे -पर्यावरणशास्त्र, नुपूर मनोहर लुहारिया-प्राणिशास्त्र, दिपीका विशाल संतोषवार- वाणिज्य, कुंदा मुरलीधरराव ठेपाले-राज्यशास्त्र, अरविंद सुर्यकांत मोतेवार-राज्यशास्त्र, महेंद्र हरीचंद बागडे-इंग्रजी, संतोष सदाशिव देठे - मराठी, प्रकाश गौरीशंकर सिंग -शारीरीक शिक्षण, सुनिल चर्तुवेदी- शारीरीक शिक्षण, तुळशीराम पंढरीनाथ खडके -शारीरीक शिक्षण , प्रीया प्रकाश त्रिवेदी- शिक्षणशास्त्र, मार्र्कंड परसराम चौरे - शारीरीक शिक्षण, चंद्रशेखर विश्वनाथ बनकर - ग्रथालय व माहीती विज्ञान, अम्रीता योगेंद्र पांडे -शारीरीक शिक्षण‘त्या’ ४९ गावांना देणार सौर उर्जागडचिरोली जिल्ह्यातील ४९ गावांमध्ये अद्यापही वीज पुरवठा होत नाही. गावांत वीज पुरविण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये सौरउर्जेतून वीज पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आजच जिल्हाधिकाºयांनी चर्चेदरम्यान दिल्याचे गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले.आदिवासी संशोधन केंद्राचा प्रस्तावगेल्यावर्षी झालेल्या ‘व्हिजन कॉन्फरन्स’मधील चर्चेच्या अनुषंगाने विद्यापीठाने आदिवासी संशोधन केंद्राचा आराखडा तयार केला असून भारत सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालयाकडे तो लवकरच सादर करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती व पारंपरिक कला प्रकाराचे अध्ययन व त्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती कुलगुरूंना आपल्या भाषणात दिली.जिल्हा बँकेच्या शाखा वाढाव्याजिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांचे जाळे फारच कमी आहे. त्यामुळे शेतकºयांना कर्ज मिळत नाही. इंटरनेट सुविधेचा अभाव हे बँकांच्या विस्तारातील प्रमुख अडचण आहे. इंटरनेटची सुविधा देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असून प्रत्येक गावात इंटरनेट पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. अडचणीच्या परिस्थितीतही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेची स्थिती मात्र चांगली आहे. त्यामुळे त्यांच्या शाखा आणखी वाढाव्यात अशी अपेक्षा करून त्यासाठी त्यांना मदत करा, अशी सूचना गडकरी यांनी जिल्हाधिकाºयांना उद्देशून केली.अनेक मान्यवरांची उपस्थितीया कार्यक्रमाला पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, जिल्हा नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, माजी कुलसचिव डॉ.विनायक इरपाते आदींसह विविध क्षेत्रातील लोक, प्राचार्य, संस्थांचे पदाधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्व मान्यवर प्रेक्षकांमध्ये बसले होते.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी