शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पेंढरीची आश्रमशाळा समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:14 IST

अस्वच्छतेचे साम्राज्य : आदिवासी विकास विभागाचे दुर्लक्ष, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खोअलाउद्दीन लालानी ।ऑनलाईन लोकमतधानोरा : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत पेंढरी येथील शासकीय आश्रमशाळेत विविध समस्या निर्माण झाल्या असल्याने येथील विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. शौचालय व बाथरूमची पाईपलाईन फुटलेली आहे. तसेच ...

अस्वच्छतेचे साम्राज्य : आदिवासी विकास विभागाचे दुर्लक्ष, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खोअलाउद्दीन लालानी ।ऑनलाईन लोकमतधानोरा : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत पेंढरी येथील शासकीय आश्रमशाळेत विविध समस्या निर्माण झाल्या असल्याने येथील विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. शौचालय व बाथरूमची पाईपलाईन फुटलेली आहे. तसेच स्वयंपाकगृहाच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. परिणामी दुर्गंधीने येथील विद्यार्थी त्रस्त आहेत. मात्र या समस्यांकडे प्रकल्प कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे.पेंढरी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. बारावीच्या कला व विज्ञान अशा दोन शाखा येथे आहेत. मात्र उच्च माध्यमिक शिक्षकांचे पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मुख्यालयाला खो देत असल्याने रात्री ही शाळा चौकीदार व परिचराच्या भरवशावर राहते. अधीक्षक कधीकधी रात्री मुक्कामी राहतात, अशी माहिती आहे. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत विद्यार्थी आश्रमशाळेबाहेर भटकत असल्याची माहिती आहे. स्वयंपाकगृहात भांडे व्यवस्थित ठेवले जात नाही. एकूणच सदर आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांचे भौतिक सुविधा, व्यवस्था व प्रशासकीय कामाकडे दुर्लक्ष होत आहे. प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट देऊन येथे आवश्यक त्या सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी होत आहे.पेंढरी आश्रमशाळेत अनेक समस्या आहेत. मात्र याकडे मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष होत आहे. मुख्याध्यापकांसह येथील शिक्षक गडचिरोलीवरून अपडाऊन करतात. त्यामुळे विद्यार्थी आश्रमशाळेबाहेर फिरत असतात. याबाबतची तक्रार आपण प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आहे. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.- श्रीनिवास दुलमवार, जि.प. सदस्य, पेंढरी-गट्टा क्षेत्रनऊ पेक्षा अधिक पदे रिक्तपेंढरी आश्रमशाळेत मराठी, गणित व विज्ञान विषयाच्या उच्च माध्यमिक शिक्षकांचे तीन पदे रिक्त आहेत. माध्यमिक विभागाचे गणित विषयाच्या शिक्षकाचे तर एका प्राथमिक शिक्षकाचे पद रिक्त आहेत. तसेच चौकीदारांची दोन व कामाठी दोन अशी नऊ पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.