शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवरील खड्डे व शौचालय भ्रष्टाचारावरून सभेत घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:00 IST

चामोर्शी पंचायत समितीची वार्षिक आमसभा पंचायत समितीच्या पटांगणात सोमवारी पार पडली. या सभेत चामोर्शी तालुक्यात सुरू असलेला अवैध रेती उपसा व शौचालयांचे बांधकाम अपूर्ण असतानाही केली जाणारी निधीची उचल यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामध्ये घमासान चर्चा झाली.

ठळक मुद्देचामोर्शी पंचायत समितीची वार्षिक आमसभा : जि.प. अध्यक्ष व आमदारांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर

ओढले ताशेरेलोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी पंचायत समितीची वार्षिक आमसभा पंचायत समितीच्या पटांगणात सोमवारी पार पडली. या सभेत चामोर्शी तालुक्यात सुरू असलेला अवैध रेती उपसा व शौचालयांचे बांधकाम अपूर्ण असतानाही केली जाणारी निधीची उचल यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामध्ये घमासान चर्चा झाली.आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, सभापती आनंद भांडेकर, उपसभापती आकुली बिश्वास, जि.प. सदस्य प्रा. रमेश बारसागडे, नामदेव सोनटक्के, विद्या आभारे, रंजिता कोडापे, शिल्पा रॉय, पं.स. सदस्य रेखा नरोटे, उषा सातपुते, विष्णू ढाली, संगीता भोयर, धर्मशीला सहारे, भाग्यश्री चिंतलवार, भाऊराव डोर्लीकर, माधव परसोडे, चंद्रकला आत्राम, प्रिती बिश्वास, विनोद मडावी, सुरेश कामेलवार, वंदना गौरकर, शिवराम कोसरे, शंकर आकरेड्डीवार, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख उपस्थित होते. वार्षिक आमसभेच्या सुरूवातीला जिल्हा परिषद कुरूड शाळेच्या मुलांनी स्वागतगीत सादर केले. राष्टÑगीत व संविधानाची शपथ घेऊन सभेला सुरूवात झाली. तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या आमचा गाव, आमचा विकास हा उपक्रम सुरू केला आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जनतेच्या तक्रारी व समस्या अधिकाऱ्यांनी सोडविण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.मुरखळा ग्रा.पं. सदस्य यशवंत लाड यांनी गावात असलेल्या शासकीय इमारती ग्रामपंचायत प्रशासनाकडे हस्तांतरीत केल्यास दुरूस्ती होऊ शकते, असा मुद्दा उपस्थित केला. विनोद गौरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यावर लाखो रूपये खर्च केले. गणूपर-जैरामपूर मार्गावरील खड्ड्यांचे मोजमाप केले. मात्र खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे, असा मुद्दा उपस्थित केला. माणिकचंद कोहळे यांनी चामोर्शी तालुक्यात अवैध रेती, मुरूम, गौण खनिज व उपसा वाढला आहे. मार्र्कंडा मार्गावरील आयटीआय जवळ असलेल्या डोंगरीवर अवैध उत्खनन झाले आहे. याची चौकशी करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, असा मुद्दा उपस्थित केला. मंगेश पोरटे यांनी अपंगांसाठी असलेल्या राखीव निधीचे अनेक ग्रामपंचायतींनी वाटप केले नाही. ज्या ग्रामपंचायतींनी निधीचे वाटप केले नाही, संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करावी, असे निर्देश सभा अध्यक्षांनी दिले.चामोर्शी तालुक्यातील घरकूल व शौचालय बांधकामाची चौकशी करून बांधकाम न करताच पैशाची उचल करणाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी दिले.शासनाच्या योजना राबविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांच्यामध्ये समन्वय साधून विकास करता येते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमसभेकडे पाठ फिरविली. अशा अधिकाऱ्यांवर हक्कभंगाची कारवाई व वेतनवाढीची कारवाई करण्याबाबतचा ठराव आमसभेत घेण्यात आला. या ठरावाची प्रत राज्यपाल, प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविली जाणार आहे. प्रास्ताविक सहायक गट विकास अधिकारी नितेश माने, संचालन गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे तर विस्तार अधिकारी डी. पी. भोगे यांनी आभार मानले. सभेला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, विभाग प्रमुख उपस्थित होते.