शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आता गोंडवाना विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल फेलोशिपची संधी

By दिलीप दहेलकर | Updated: May 7, 2023 17:26 IST

सुविधेमुळे विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन आणि मानव विज्ञान विद्या शाखा आदी विद्याशाखांमधील पीएच.डी. धारकांना पुढील संशोधनासाठी संधी विद्यापीठात उपलब्ध होणार आहे.  

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील संशोधकांसाठी फेलोशिपची संधी आहे. पीएचडी मिळवल्यानंतर पुढेही संशोधन करावयाचे असल्यास 'पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप'ची संधी गोंडवाना विद्यापीठात उपलब्ध होत आहे. त्यामुळे संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या सुविधेमुळे विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन आणि मानव विज्ञान विद्या शाखा आदी विद्याशाखांमधील पीएच.डी. धारकांना पुढील संशोधनासाठी संधी विद्यापीठात उपलब्ध होणार आहे.  

अशी मिळवता येईल फेलोशिप

फेलोशिपबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली असून, पात्रता निकष पूर्ण असणारे विद्यार्थी १० मेपर्यत अर्ज करू शकतात. याबाबत परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे अशी माहिती नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार यांनी दिली आहे.

फेलोशिपची वैशिष्ट्ये

पोस्ट-डॉक्टरेट संशोधन हे शैक्षणिक/संशोधन सुरू करण्यासाठी तसेच तरुण संशोधकांना तयार करण्यासाठी एक महत्त्वाचे सक्षम पाऊल आहे.गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या पीएच. डी. धारकांना विद्यापीठ पोस्ट डॉक्टरल फेलोशिपचा लाभ घेता येईल.पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपमध्ये २४ हजार रुपये दरमहा फेलोशिप असेल. दरवर्षी देण्यात येणाऱ्या पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपची एकूण संख्या चार असेलपोस्ट-डॉक्टरल फेलोशिप विद्यापीठाच्या चार विद्याशाखांमधून जसे, की विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, मानव विज्ञान विद्या शाखा आणि आंतरविद्याशाखा राहील.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली