शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा उष्णतेच्या लाटेची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:51 IST

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळयात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. तसेच मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्हाळयाची सुरूवातसुध्दा लवकर झालेली आहे.

ठळक मुद्देहवामान खात्याचा अंदाज : खबरदारी घेण्याचे जिल्हा आपत्ती प्राधिकरणचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळयात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. तसेच मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्हाळयाची सुरूवातसुध्दा लवकर झालेली आहे. तेव्हा उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याबाबत आवश्यक उपाययोजना संबंधित यंत्रणांनी कराव्यात असे शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही उन्हापासून स्वत:चा बचाव करावा, असे जिल्हा आपत्ती प्राधिकरणने म्हटले आहे.उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचा बचाव वेळीच करणे शक्य होईल यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. तहान लागलेली नसली तरी सुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कापडे वापरावित. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलांचा वापर करावा. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविलेली लस्सी, तोरणी, लिंबू- पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे आहेत. चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्या, पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असतांना मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी. उन्हापासून संरक्षणाकरिता रस्त्याच्या कडेला शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा प्रशासनाने व सामाजिक संस्थांनी करावी. उन्हाळ्यात उष्माघाताचे दरवर्षी शेकडो बळी जातात. त्यामुळे नागरिकांनी तसेच प्रशासनानेही खबरदारी घ्यावी, असे आपत्ती प्राधिकरणने म्हटले आहे.बचावासाठी या गोष्टी टाळाव्यालहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद रंगाचे, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्या, असे केल्यास स्वत:चा उन्हापासून बचाव करता येईल.