लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड ते मानापूर पुढे अंगारापर्यंतचा रस्ता अरूंद आहे. त्यातच शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचबरोबर झुडपेही रस्त्यावर आली आहेत. परिणामी या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.वैरागड ते अंगारा रस्त्याचे सीमांकन झाले असून रस्त्याची रूंदी निश्चित करण्यासाठी रूंदी दर्शविणारे दगड मुख्य रस्त्यापासून १५ ते २० फुटावर लावण्यात आले आहेत. याचा अर्थ अर्धेअधिक रस्त्यावर अतिक्रमण झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. काही शेतकºयांच्या शेतामध्ये खांब गडले आहेत. खांबापर्यंत रस्त्यांची हद्द असल्याची जाणीव शेतकºयांना असतानाही रस्त्यापर्यंत कुपन करण्यात आले आहे. या मार्गावरील सुकाळा फाटा ते शिवणीपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे की, केवळ १० ते १२ फुटाचा रस्ता शिल्लक राहिला आहे. सदर मार्गावर अनेक गावे येतात. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. समोरासमोर दोन वाहने आल्यास बाजू देताना फारमोठी कसरत करावी लागते. तसेच वाहनाला ओव्हरटेक करणेही शक्य होत नाही.रस्त्यावर कुंपन करूनही कोणीच अटकाव करीत नसल्याने दिवसेंदिवस रस्त्यावर कुंपन करण्याचे प्रकार वाढत चालले आहे. ही अतिशय गंभीर बाब असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. वळण मार्गावर समोरचे वाहन दिसत नाही. परिणामी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डांबरी रस्त्याच्या बाजूला दोन ते तीन फूट अंतरावर मुरूम टाकणे आवश्यक आहे. मात्र मुरूमही टाकण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्याची रूंदी पुन्हा कमी झाली आहे.रस्त्याला झुडपांचा वेढारस्त्याच्या बाजूलाच झुडूपे आहेत. झुडूप व झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळेही रस्त्याची रूंदी आणखी कमी झाली आहे. बाजूला वाहन गेल्यानंतर झुडूपांच्या फांद्या लागतात. एवढेच नाही तर ट्रकसारखे मोठे वाहन या मार्गावरून गेल्यास दोन्ही बाजूने झाडाच्या फांद्या लागतात. त्यामुळे वाहनचालक तसेच बसमधील प्रवाशी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्याच्या बाजूला दोन ते तीन फुटावर मुरूम टाकण्यात आले नाही. त्यामुळे अगदी डांबरी रस्त्याला लागूनच गवत उगवले आहे. बाजू भरली नसल्याने खोलगट भाग निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहन खाली उतरल्यास तो डांबरवर चढविताना अडचण होत आहे.
अरूंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:54 IST
वैरागड ते मानापूर पुढे अंगारापर्यंतचा रस्ता अरूंद आहे. त्यातच शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचबरोबर झुडपेही रस्त्यावर आली आहेत.
अरूंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता
ठळक मुद्देवैरागड-मानापूर मार्गावर अडथळा : शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने कमी झाली रूंदी