शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गढूळ पाणीपुरवठ्याने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:02 IST

शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून स्थानिक इंदिरा गांधी चौक परिसरात जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची निर्मिती केली. मात्र या रुग्णालयात बांधकामाच्या वेळी पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश करण्यात आला नाही.

ठळक मुद्देमहिला रुग्णालयातील समस्या : जलशुद्धीकरण केंद्रासाठी पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून स्थानिक इंदिरा गांधी चौक परिसरात जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची निर्मिती केली. मात्र या रुग्णालयात बांधकामाच्या वेळी पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश करण्यात आला नाही. या रुग्णालयाला कठाणी नदीतून थेट पाणीपुरवठा होत आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात रुग्णालयात गढूळ पाणी येत असल्याने येथील रुग्णांना जलजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महिला रुग्णालयाची कठाणी नदीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठीची स्वतंत्र नळ पाईपलाईन आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कठाणी नदी कोरडी पडत असल्याने पाणीटंचाई भासू नये, याकरिता नगर पालिकेच्या वैनगंगा नदीवरील पाणी योजनेची स्वतंत्र नळ पाईपलाईन बसविण्यात आली आहे. या दोन्ही नळ पाईपलाईनमधून रुग्णालयाला पाणीपुरवठा होत आहे. मात्र कठाणी नदीतून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने येथील रुग्णांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. यासंदर्भात महिला रुग्णालय प्रशासनामार्फत आलम व ब्लिचिंग पावडरच्या सहाय्याने कठाणी नदीतून टाकीत येणाºया पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे काम होत आहे. मात्र ही तात्पुरती व्यवस्था आहे. सदर रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर व कर्मचारी आदींची वाढती संख्या लक्षात घेता, या रुग्णालयात स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करणे अत्यावश्यक आहे. रुग्णालय इमारत बांधकामाच्या प्रस्तावात वॉटर फिल्टर प्लॅन्टचा समावेश असता तर आज ेगढूळ पाण्याचा प्रश्न उद्भवला नसता.याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपचंद सोयाम यांनी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंत्यांना पत्र पाठवून जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करण्याची विनंती केली आहे. जिल्हा नियोजन समितीतून ३५ लाख रूपयांची तरतूद झाल्यास येथे फिल्टर प्लॅन्ट होईल.जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कठाणी नदीमधून थेट पाणीपुरवठा केला जात असल्याने पावसाळ्यात गढूळ पाणी येते. यावर उपाय म्हणून आलम व ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात असून कठाणी नदीतून रुग्णालयाच्या टाकीत पडणाºया पाण्याचे शुद्धीकरण केले जात आहे. रुग्णालयात जलशुद्धीकरण केंद्र आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव सादर करून त्याचे अंदाजपत्रक तयार करावे, अशा आशयाचे पत्र महिला रूग्णालय प्रशासनामार्फत महाराष्टÑ जीवन प्राधिकरण गडचिरोलीच्या उपअभियंत्यांना पाठविण्यात आले आहे. तसेच या पत्राची प्रत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनाही पाठविण्यात आली आहे.- डॉ.दीपचंद सोयाम, वैद्यकीय अधीक्षक,जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणHealthआरोग्य