शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

ठेंगणा पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:34 IST

तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

ठळक मुद्देकुंभीवासीय त्रस्त : पावसाळ्यात पुलावरून वाहते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.चांदाळा गावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर कुंभी हे गाव आहे. या गावची लोकसंख्या एक हजारच्या जवळपास आहे. कुंभी गावाला जाताना पोटफोडी नदी पडते. या नदीवर पूल नव्हता, त्यावेळी नागरिक डोंग्याने प्रवास करीत होते. अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर नदीवर पूल बांधण्यात आला. जवळपास दोन फूट उंचीचे पाईप टाकून पूल बांधला आहे. पोटफोडी नदी जंगलातून येते. त्यामुळे थोडाही पाऊस झाला तरी नदीच्या पाण्याची पातळी वाढते व पूल पाण्याखाली येते. पावसाळ्यात अनेकवेळा सदर पूल बुडून राहते. या गावात पहिली ते चवथी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. त्यानंतर पाचवीपासून चांदाळा व अकरावीपासून गडचिरोली येथे यावे लागते. पावसाळ्यात पुलावरून पाणी राहत असल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडते. तर काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेत येतात.गडचिरोली हे तालुका व जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या गावातील नागरिकांनाही गडचिरोली येथे येताना याच पुलाचा सामना करावा लागतो. प्रचारासाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला येथील गावकरी पूल बांधून देण्याची मागणी करतात. निवडणुकीपुरते आश्वासन दिले जाते. मात्र त्यानंतर राजकीय पदाधिकाऱ्यांनाही विसर पडते. त्यामुळे ठेंगण्या पुलाची समस्या कायम आहे. पूल बांधकामाची आश्वासने ऐकून नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. यानंतर निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल. तसेच जो उमेदवार पूल बांधकामाचे ठोस आश्वासन देईल, त्यालाच मतदान केले जाईल, असा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे.माडेमूलचाही रस्ता अडतोकुंभी गावाजवळच माडेमूल हे गाव आहे. माडेमूल गावाला जाण्यासाठीही पोटफोडी नदी ओलांडून जावे लागते. या गावाला सुद्धा कुंभी गावाप्रमाणेच पाईप टाकून जवळपास तीन ते चार फूट उंचीचा पूल बनविण्यात आला आहे. मात्र पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर या पुलावरूनही पाणी वाहते. त्यामुळे या गावातील नागरिकांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.