शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांच्या ट्रान्सफार्मरची दैनावस्था; विद्युत प्रवाहित हाेण्याचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:39 IST

शासकीय स्तरावरून देण्यात आलेल्या सिंचन विहिरी, विंधन विहिरी बेरोजगारीवर मात करण्यासाठी पर्याय ठरू लागल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी कृषिपंपांचा ...

शासकीय स्तरावरून देण्यात आलेल्या सिंचन विहिरी, विंधन विहिरी बेरोजगारीवर मात करण्यासाठी पर्याय ठरू लागल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी कृषिपंपांचा वापर करणे सुरू केले आहे. मात्र एकाच लाइनमनकडे पाच-पाच गावांचा प्रभार असल्याने लावण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात जराही ओव्हरलोड झाल्यास वारंवार फ्युज उडणे ही समस्या नेहमीच उद्भवते. यामुळे सिंचन सुविधा प्रभावित होते. ओव्हरलोडने फेज आपाेआप उडतात; परंतु वारंवार हेच होत असल्याने संबंधित शेती परिसरात पंपांच्या फेजबाबत समजणारे व फेज टाकणारे गावागावात तयार झाले आहेत. ओव्हरलोड झाल्यानंतरही न उडणारे ठोकळ स्वरूपाचे फ्युज टाकत असल्याने ते फ्युज टाकण्याचे चिनीमातीचे आतील साहित्य जळून खाक होते. पर्यायाने ते वापरण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश भागातील ट्रान्सफार्मर आतून भस्म झालेले आहेत. शेतकऱ्यांना लाइनमन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पर्यायाने गावातीलच कृषिपंपांचे ट्रान्सफार्मर हाताळणाऱ्या लाेकांना हाताशी धरून शेतकऱ्यांना वेळीच फ्युज टाकून समस्या साेडवावी लागते.

बाॅक्स

लाइनमनकडे अनेक गावांचा भार

आजच्या घडीला डीपी बाॅक्समधील फ्युज लाॅकसिस्टीमचे असले तरी गरजेच्या वेळी डीपी बाॅक्स जबरदस्तीने उघडले जात असल्याने लाॅक तुटलेले दरवाजे सताड उघडे राहते. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देसाईगंज तालुक्यातील बहुतांश भागातील ट्रान्सफार्मरची ही दुरवस्था आहे. त्यामुळे ट्रान्सफार्मरचे आतील जळालेले फेज बदलून त्या जागी नवीन लावावे. तसेच डीपी बाॅक्स कुलूपबंद करण्यात यावे व गावात नेमलेल्या लाइनमनकडील अतिरिक्त गावांचा भार काढून त्या ठिकाणी आवश्यक पदे भरावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

250821\img_20200324_113617.jpg

तालुक्यातील ट्रान्सफार्मरची दुरावस्था