शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतींसह ग्रामपंचायतींसाठी निर्विघ्नपणे पार पडले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST

सर्वच ठिकाणी चांगली चुरस निर्माण झाली होती. मात्र, ग्रामपंचायतींच्या अनेक जागांसाठी एकही नामांकन आले नसल्यामुळे २०० पेक्षा अधिक जागा रिक्त राहणार आहेत. ४६ ग्रामपंचायतींमधील केवळ ७१ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. नगरपंचायतींसाठी सर्वाधिक ८८.८६ टक्के मतदान कोरची येथे झाले. त्याखालोखाल ८७.७३ टक्के मुलचेरात झाले. सर्वात कमी ६७.४९ टक्के मतदान भामरागडमध्ये झाले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसह ४६ ग्रामपंचायतींमधील ७१ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत आणि कोणताही नक्षली अडथळा न येता निर्विघ्नपणे मतदान झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास सोडला. नगरपंचायतींमधील ७५.४१ टक्के मतदारांनी तर ग्रामपंचायतींमधील ७३.७२ टक्के मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला. 

या निवडणुकीत नगरपंचायतींच्या १४२ जागांसाठी ५५५ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे सर्वच ठिकाणी चांगली चुरस निर्माण झाली होती. मात्र, ग्रामपंचायतींच्या अनेक जागांसाठी एकही नामांकन आले नसल्यामुळे २०० पेक्षा अधिक जागा रिक्त राहणार आहेत. ४६ ग्रामपंचायतींमधील केवळ ७१ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. नगरपंचायतींसाठी सर्वाधिक ८८.८६ टक्के मतदान कोरची येथे झाले. त्याखालोखाल ८७.७३ टक्के मुलचेरात झाले. सर्वात कमी ६७.४९ टक्के मतदान भामरागडमध्ये झाले. सकाळी ७.३० पासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. दुपारी ३ वाजता रांगेत असलेल्या सर्वांना केंद्राच्या आत घेऊन बाहेरील फाटक बंद करण्यात आले.  

उमेदवारांच्या प्रतिनिधींचा बिनधास्त वावरचामोर्शीसह इतर काही ठिकाणच्या मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या प्रतिनिधींचा मतदान केंद्राच्या परिसरात बिनधास्त वावर होता. रांगेत उभ्या मतदारांना ते वारंवार सूचनाही करत होते. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आर्थिक प्रलोभन देऊन मतदानासाठी बोलविण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे या निवडणुकीत ज्या प्रभागात तगडे उमेदवार आहेत, त्या प्रभागातील मतदारांनी संधीचे सोने केल्याची चर्चा मतदान केंद्र परिसरात सुरू होती.

‘पिंक बुथ’ने वेधले लक्षनक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील एटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी पहिल्यांदाच ‘पिंक बुथ’ निर्माण करण्यात आला होता. समूह निवासी शाळा खोली क्रमांक २ येथे केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, एवढेच नाही तर बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व महिलाच होत्या. या बुथचे प्रवेशद्वार, लक्षवेधी सेल्फी पॉईंट, केंद्रातील पडदे, फुगे सर्वकाही गुलाबी रंगात होते. महिला कर्मचारीही गुलाबी पोषाखात होत्या. या उपक्रमासाठी तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय एसडीपीओ डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

 

टॅग्स :Electionनिवडणूक