शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

९३५ केंद्रांवर आज लोकसभेसाठी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:56 IST

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात गुरूवारी (दि.११) ९३५ केंद्रांवर मतदान होणार आहे. रिंगणात असेलल्या पाच पक्षीय उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील ७ लाख ७२ हजार ९५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ठळक मुद्दे५ उमेदवार रिंगणात । ७ लाख ७२ हजार मतदार । ४१२८ कर्मचाऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात गुरूवारी (दि.११) ९३५ केंद्रांवर मतदान होणार आहे. रिंगणात असेलल्या पाच पक्षीय उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील ७ लाख ७२ हजार ९५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ३ लाख ९२ हजार १८२ पुरूष तर ३ लाख ८० हजार ७६८ महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी ३२०६ नवमतदार असून ते पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या निवडणुकीच्या रिंगणात पाच भाजपचे अशोक नेते, काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे देवराव नन्नावरे हे पाच उमेदवार उभे आहेत. मात्र खरी लढत भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये आहे. गेल्यावेळीही याच दोन उमेदवारांमध्ये लढत होऊन नेते यांनी एकतर्फी विजय मिळविला होता. यावेळी ही लढत अटीतटीची असल्याचे वातावरण आहे.गडचिरोलीत कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील मतदान कर्मचाऱ्यांना बुधवारी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसह केंद्रावरील साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर हे कर्मचारी विविध वाहनांनी आपापल्या केंद्रांकडे रवाना झाले. त्यांना पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्यांसह खासगी ट्रॅव्हल्स बसेस आणि काळीपिवळी टॅक्सींही भाड्याने घेण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात अल्पदृष्टी असलेले ३५१, मुकबधीर ३०८, शारीरिक अपंग १३६५ आणि इतर १७२ असे एकूण २१९६ दिव्यांग मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. शारीरिक दिव्यांगासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १३४, आरमोरी विधानसभा क्षेत्रात ४९, अहेरी विधानसभा क्षेत्रात १३३ अशा एकूण ३१६ व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंध मतदारांना ब्रेल लिपीच्या सहाय्याने मतदान करता येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोयही राहणार आहे.४२१ केंद्र संवेदनशीलजिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांपैकी ४२१ मतदान केंद्र संवेदनशिल व अतिसंवेदनशिल आहेत. नक्षलवाद्यांना त्या भागात कोणत्याही अनुचित घटना घडविण्यात यश येऊ नये यासाठी पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ यांच्याकडे विविध भागांची जबाबदारी देण्यात आली आहे. मतदान दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर ड्युटी लागलेल्या कर्मचाºयांना मंगळवारी अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयातून तर बुधवारी काही कर्मचाºयांना गडचिरोली व देसाईगंज येथून हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आले. तेथून पोलीस संरक्षणात हे कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले.दिव्यांगांच्या मदतीसाठी २१० स्वयंसेवकमतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांना मतदानासाठी मदत व्हावी म्हणून एनसीसी, एनएसएस आणि स्काऊट-गाईडच्या २१० विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून ठेवले जाणार आहे. याशिवाय १६४ केंद्रांवर ३६५ व्हिलचेअरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८१४ मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्थाही करण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.वृद्ध, गरोदर महिलांची विशेष काळजीमतदान करण्यासाठी येणारे वृध्द नागरिक, गरोदर व स्तनदा माता या मतदारांना मतदानासाठी रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि अंध व्यक्तींसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करु न देण्यात येत असल्याचे प्रशासनाने कळविले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019