शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत दोन बॉम्ब स्फोटातून बचावले पोलीस पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 13:44 IST

नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (दि.३०) पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी जमिनीत पेरून ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट घडवून आणला.

ठळक मुद्देनक्षलवाद्यांचा घातपात करण्याचा डाव ठरला निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (दि.३०) पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी जमिनीत पेरून ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट घडवून आणला. नक्षलविरोधी अभियान राबविणारे पोलीस पथक पायी जात असताना मुख्य मार्गालगत हे दोन स्फोट झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घातपात घडविण्याचा नक्षल्यांचा डाव निष्फळ ठरल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील रेगडी उपपोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रेगडी-कसनसूर मार्गावर रात्री नक्षलवाद्यांनी कुकरच्या सहाय्याने बनविलेला एक प्रेशर बॉम्ब (आयईडी) आणि लोखंडी पाईपमध्ये छर्रे भरून तयार केलेला एक क्लेमोर बॉम्ब जमिनीत पेरून ठेवला होता. पोलीस ठाण्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर विकासपल्ली फाट्याजवळ नक्षल्यांनी आपले बॅनर लावल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने ते काढण्यासाठी पोलीस पथक गेले होते.तेथून ठाण्याकडे येत असतानाच पोलीस पथकापासून १०० फूट अंतरावर दोन्ही बॉम्बचा एकामागोमाग स्फोट झाला. याचवेळी एक युवक रस्त्याच्या कडेने झुडुपात लपत पळून जाताना आढळला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो जंगलात दिसेनासा झाला. दोन्ही बॉम्बमध्ये सुमारे २० फुटांचे अंतर होते.

- तर झाली असती जीवित हानीया दोन बॉम्बपैकी प्रेशर बॉम्बच्या स्फोटामुळे साडेतीन फूट रूंद आणि ३ फूट खोल खड्डा पडला आहे. पोलीस पथक त्या ठिकाणाच्या जवळ असते तर मोठी जीवित हानी झाली असती. या स्फोटानंतर त्या परिसरात आणखी बॉम्ब पेरले आहेत का याची तपासणी करण्यात आली. २८ जुलैपासून सुरू झालेल्या नक्षल शहीद सप्ताहादरम्यान पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे आतापर्यंत हा स्फोट वगळता कोणतीही हिंसक घटना घडवून आणण्यात नक्षलवाद्यांना यश आलेले नाही.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी