शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी केला नारगुंडा रस्ता दुरूस्त

By admin | Updated: February 11, 2016 00:05 IST

भामरागड तालुक्यातील नारगुंडा ते हलवेर या मार्गाची दुरवस्था झाली होती. येथून चारचाकी व दुचाकी वाहने चालविणेही कठीण झाले होते.

साबांवि सुस्त : पोलीस अधीक्षकाच्या दौऱ्यात नागरिकांनी केली होती रस्त्याची तक्रारभामरागड : भामरागड तालुक्यातील नारगुंडा ते हलवेर या मार्गाची दुरवस्था झाली होती. येथून चारचाकी व दुचाकी वाहने चालविणेही कठीण झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी मुरूम टाकून हा रस्ता दुरूस्त केला. नारगुंडा-हलवेर मार्गावर हलवेरपासून तीन ते चार किमीपर्यंतच्या रस्त्याची गिट्टी उखडून गेली होती. त्यामुळे दुचाकी चालविणे कठीण जात होते. दुचाकी चालकांना नाईलाजास्तव जंगलाच्या पायवाटेतून मार्ग काढावा लागत होता. राज्य परिवहन महामंडळाची बसफेरीही खराब रस्त्यामुळे बंद झाली होती. गेल्या १६ वर्षांपासून या रस्त्याच्या डागडुजीकडेही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होते. बिआरओच्या पुढाकाराने १६ वर्षांपूर्वी हा रस्ता बनविण्यात आला होता. या मार्गावर कुचेर, खंडीनैनवाडी, नारगुंडा आदी गावे येतात. नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांना, नागरिकांना खराब रस्त्यामुळे त्रास होत होता. पाच वर्षांपासून हा रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक नारगुंडा येथे भेटीसाठी गेले असता, नागरिकांनी त्यांच्याकडेही या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने स्वत: पुढाकार घेऊन रस्त्यावर मुरूम टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी सज्ज केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामही गडचिरोलीच्या दुर्गम भागात पोलीस प्रशासनालाच करावे लागत आहे, हे यावरून दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)