शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची दारू अड्ड्यांवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:27 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा पोलिसांनी १ व २ जुलै रोजी अशा दोन दिवस तालुक्यातील खेडी व आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा येथील दारू अड्यावर धाड टाकून येथून एकूण २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून यातील सात आरोपी फरार झाले आहेत.

ठळक मुद्देपाच आरोपींना अटक : २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा पोलिसांनी १ व २ जुलै रोजी अशा दोन दिवस तालुक्यातील खेडी व आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा येथील दारू अड्यावर धाड टाकून येथून एकूण २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून यातील सात आरोपी फरार झाले आहेत.धानोरा पोलिसांनी १ जुलै रोजी खेडी येथील जंगल परिसरात धाड टाकली असता चार इसम मोहसडवा तयार करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच इसम पळायला लागले. पोलिसांनी एका आरोपीस पकडले व तीन आरोपी फरार झाले. गजेंद्र मोतीराम मडावी रा.खेडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खेडी येथून मोहफूल सडवा, तीन प्लास्टिक ड्रम, असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.दुसरी कारवाईत २ जुलै रोजी पिसेवडधा येथील शेतशिवार व जंगल परिसरात पोलिसांनी धाड टाकली. यावेळी आठ आरोपी मोहफुलाची दारू गाळताना दिसून आले. पोलिसांना पाहताच चार आरोपी फरार झाले. विनोद वारलू आळे (४५), रवींद्र वासुदेव खोडपे (४०) रा.पिसेवडधा, वेलिदास आडकू साखरे (४८) रा.देलनवाडी, संजय भारत चांग (२९) रा.धामनगाव ता.भिवापूर जि.नागपूर हल्ली मुक्काम पिसेवडधा, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. श्रावण शिंपी, लोमेश निकोडे, सचिन बोरूले व सितकुरा मोगरकर हे चार आरोपी फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पिसेवडधा येथील शेतशिवारातून २०० लिटरच्या सात प्लास्टिक ड्रममध्ये भरलेला १ हजार ४०० लिटर तसेच २० प्लास्टिक ड्रममध्ये दोन हजार लिटर असा एकूण ३ हजार ४०० लिटर मोहफूल सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. खेडी व पिसेवडधा या दोन्ही कारवाया मिळून एकूण २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई धानोराचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार, पोलीस शिपाई चेतन फुले, नितीन पिलारे, देवचंद रतनपुरे, प्रकाश कृपाकर, रंगनाथ गावडे, विनोद चुनारकर आदीसह महिला पोलिसांनी पार पडली.२६ जून रोजी धानोरा पोलिसांनी तीन ठिकाणी धाड टाकून मोठ्या प्रमाणात दारूसाठा व मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून धानोरा पोलिसांनी पुन्हा धाडसत्र जोमात सुरू केले आहे.