शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे अडकलेल्यांना पोलिसांनी दिला आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:27 IST

शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत होते. पुरामुळे अडकलेल्या प्रवाशांना ताडगाव पोलिसांनी आश्रय देत रात्रभर त्यांच्या झोपण्याची व्यवस्था केली. तसेच जेवन सुद्धा दिले. पोलिसांची ही माणुसकी बघून प्रवाशी भारावून गेले.

ठळक मुद्देजेवण-निवास व्यवस्था । ताडगावात सोय

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत होते. पुरामुळे अडकलेल्या प्रवाशांना ताडगाव पोलिसांनी आश्रय देत रात्रभर त्यांच्या झोपण्याची व्यवस्था केली. तसेच जेवन सुद्धा दिले. पोलिसांची ही माणुसकी बघून प्रवाशी भारावून गेले.शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भामरागड येथून एसटी महामंडळाची बस व काळीपिवळी वाहने आलापल्लीला जाण्यास निघाली. परंतु भामरागडपासून काही दूर अंतरावर असलेल्या पोसफुंडी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. काही वेळाने पाणी उतरल्यानंतर नाला ओलांडून नागरिक ताडगाव येथे पोहोचले. ताडगावच्या पुढे कुडकेली नाल्याच्या पुलावरून सुद्धा पाणी वाहत होते. या ठिकाणी सुद्धा प्रवाशी थांबून पाणी कमी होण्याची वाट पाहत होते. परंतु आलापल्लीवरून कोणतेच वाहन ताडगावच्या दिशेने येत नव्हते. ही माहिती ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी समीर दाभाडे यांना माहित झाली. त्यांनी नाल्यावर जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. बांडे नदीच्या पुलावरून सुद्धा पाच फूट पाणी वाहत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जोखीन उचलून पुढे जाऊ नका, तुमच्या जेवणाची व झोपण्याची व्यवस्था पोलीस मदत केंद्रात करण्यात येईल, असे सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार सर्व प्रवाशी पोलीस मदत केंद्रात पोहोचले. जेवनानंतर पुरूष व महिला प्रवाशांची वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपण्याची व्यवस्था केली. सकाळी पूरपरिस्थिचा अंदाज घेतला असता मार्ग सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली. सर्व प्रवाशांना एसटीमध्ये बसवून निरोप दिला. खाकी वर्दीतील माणुसकी बघून प्रवाशी भारावून गेले. पोलीस मदत केंद्रात येताना चिंतातूर असलेल्या प्रवाशांच्या चेहºयावर जाताना मात्र आनंद झळकत होता.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर