आॅनलाईन लोकमतगडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सट्टापट्टी चालविणाऱ्यांविरोधात मंगळवारी मोहीम राबवून सात जणांवर कारवाई करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील दारूबंदी पथकातील अधिकारी पोलीस उपनिरिक्षक युवराज घोटके यांच्या पथकाने कॉम्प्लेक्स टी पार्इंट परिसरातील हनुमान मंदिराजवळील पानठेल्यांमध्ये सट्टापट्टी मटका चालविणारे आनंद रामदास मोहुर्ले व प्यारेलाल भिकाजी खोब्रागडे दोघेही रा. मुरखडा यांच्या धाड टाकून रोख रक्कम व जुगाराची रक्कम असा एकूण २७ हजार १४० रूपयांचा मुद्दमाल जप्त केला.सदर सट्टापट्टीचा मालक प्रफुल्ल दिगांबर बिजवे रा. गडचिरोली हा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या विरोधात तसेच प्यारेलाल खोब्रागडे व आनंद मोहुर्ले यांच्या विरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आयटीआय चौकातच लांझेडा येथील निखील प्रभाकर भुरसे हा सट्टापट्टी व्यवसाय चालवत होता. त्याच्यावरही धाड टाकली. त्याच्याकडून ८ हजार ६७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर सट्टापट्टी संजय गणवेनवार हा चालवित होता. दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामपुरी वार्डातील नवीन शासकीय महिला रूग्णालयाच्या मागील बाजूस अनिल प्रभाकर बोदलकर रा. सर्वोदय वार्ड गडचिरोली याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे असे एकूण १२ हजार २६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याचा सट्टापट्टी मालक प्रफुल्ल रामटेके हा असून दोन्ही आरोपींविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. एकाच दिवशी तीन ठिकाणी धाड टाकून सात आरोपींविरोधात गुन्हे दाखल केल्याने सट्टापट्टी लावणारे तसेच चालविणाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे.जिल्हाभरात फोफावला व्यवसायजिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, आरमोरीसह इतरही तालुक्यांमध्ये सट्टापट्टी व्यवसाय फोफावला आहे. चहाटपरी, पानठेल्यांवर सकाळपासूनच सट्टापट्टीच्य आकड्यांची चर्चा सुरू होते. ती दिवसभर कायम राहते. जिल्हाभरातील सट्टापट्टी चालकांविरोधात मोहीम उघडण्याची गरज आहे.
सट्टापट्टी चालकांवर पोलिसांचे धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:06 IST
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सट्टापट्टी चालविणाऱ्यांविरोधात मंगळवारी मोहीम राबवून सात जणांवर कारवाई करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सट्टापट्टी चालकांवर पोलिसांचे धाडसत्र
ठळक मुद्देसात जणांवर गुन्हा दाखल : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई