शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्यांनी शौर्याने दिला नक्षलवाद्यांशी लढा

By admin | Updated: August 10, 2014 23:00 IST

जनजागरण मेळाव्याच्या पूर्व तयारीचा आढावा घेऊन कोसमीवरून दुचाकीने परत येत असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा नक्षलवाद्यांनी पाठलाग करून गोळीबार केला. प्रत्यूत्तरादाखल पोलीस उपनिरीक्षक

अल्लाउद्दीन लालानी -धानोराजनजागरण मेळाव्याच्या पूर्व तयारीचा आढावा घेऊन कोसमीवरून दुचाकीने परत येत असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा नक्षलवाद्यांनी पाठलाग करून गोळीबार केला. प्रत्यूत्तरादाखल पोलीस उपनिरीक्षक अर्जुन मोहिते (३५), चंद्रकांत पाटील (३६) या दोनही पोलीस अधिकाऱ्यांनी नक्षलवाद्यांशी शौर्याने लढा दिला. सदर घटना धानोरा तालुका मुख्यालयापासून ४२ किमी अंतरावर असलेल्या मगदंड पहाडीनजीक ६ आॅगस्ट रोजी घडली, अशी माहिती नागरिकांच्या चर्चेतून पुढे आली आहे.या घटनेत सावरगाव पोलीस मदत केंद्राचे अर्जुन मोहिते व चंद्रकांत पाटील हे दोनही पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले. त्यांच्यावर सध्या नागपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे. नक्षलवाद्यांनी घटनेच्या दिवशी मगदंडजवळील पहाडी परिसरातून दुचाकीने कोसमीवरून सावरगावकडे परत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक अर्जुन मोहिते व चंद्रकांत पाटील यांचा पाठलाग केला. नक्षलवाद्यांनी या दोघांवरही मगदंडजवळ गोळीबार केला. सदर दुचाकी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन मोहिते चालवित होते. तर चंद्रकांत पाटील मागे बसले होते. नक्षलवाद्यांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचा तब्बल २०० मीटर अंतरापर्यंत पाठलाग केल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली आहे. त्यानंतर नक्षलवादी मागावर असल्याचे पाहून पोलीस उपनिरीक्षकांनी कोटगुल मार्गावरील मंदिराजवळ दुचाकी उभी केली व जंगलाचा आधार घेतला. दरम्यान दोनही पोलीस अधिकाऱ्यांनी नक्षल्यांच्या दिशेने बंदुकाच्या फैऱ्या झाडणे सुरू केले.पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रत्यूत्तराचा जोर पाहून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. कोसमी येथील जनजागरण मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी पोलीस निरीक्षक मोहिते व पाटील हे दोघेजण पोलीस सहकाऱ्याशिवाय कसे काय गेले, असाही प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे. सदर घटना सावरगावच्या चौकातील हॉटेलमध्ये घडल्याची अफवा पसरली होती. मात्र या घटनेची अधिक माहिती जाणून घेतली असता, सदर घटनाही मगदंड पहाडीनजीक घडल्याचे गावकऱ्यांच्या माहितीनुसार स्पष्ट होते.