गडचिरोली : सी-६० जवान छत्तीसगड सीमेवर दामरंचा व देचलीपेठा पोलीस स्टेशनलगतच्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना १३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. तसेच १५ मार्च रोजी जिमलगट्टा पोलीस उपविभागांतर्गत दामरंचा उप पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेलगुंड्डाम व कमलपेठा जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक झाली. या दोन्ही चकमकीदरम्यान पोलीस जवानांनी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. छत्तीसगड सीमेवरील चकमक ही चितवेली जंगल परिसरात घडली. यात पोलिसांची कोणतीही जीवित हानी झाली नाही. जवळपास एक वर्षानंतर छत्तीसगड राज्यात जाऊन नक्षलवाद्यांना हुसकावून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. (स्थानिक प्रतिनिधी)
छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक
By admin | Updated: March 16, 2015 01:13 IST