शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून महाराष्ट्र दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:15 IST

पोलीस व आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सन २०१३-१४ वर्षापासून नक्षलपीडित, आदिवासी मुला, मुलींना महाराष्ट्र दर्शन सहलीची योजना राबविली जात आहे.

ठळक मुद्दे१९ वी फेरी : पाच वर्षात १ हजार ४६९ मुला-मुलींची महाराष्ट्रवारी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पोलीस व आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सन २०१३-१४ वर्षापासून नक्षलपीडित, आदिवासी मुला, मुलींना महाराष्ट्र दर्शन सहलीची योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच वर्षात १८ फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या असून या माध्यमातून एकूण १ हजार ४६९ मुला, मुलींना महाराष्ट्र दर्शन घडविण्यात आले आहे. सहलीची १९ वी फेरी नुकतीच रवाना करण्यात आली आहे.प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते मंगळवारी १९ फेरीमधील ८२ मुला, मुलींचा समावेश असलेल्या महाराष्टÑ दर्शन सहलीला हिरवी झेंडी दाखवून ही सहल रवाना करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सम्राट वाघ, अवधूत सिंगारे उपस्थित होते.नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील मुला, मुलींचे उज्ज्वल भविष्य घडावे, तसेच त्यांच्या मनातील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी व्हावा, महाराष्ट्रातील विविध ठिकाणची औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीची माहिती व्हावी, तसेच महाराष्ट्रातील रूढी, परंपरांचे दर्शन व्हावे, या हेतूने गडचिरोली पोलीस विभागाने दरवर्षी ‘आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती’ सहल योजना राबविली जाते. या सहलीतून जिल्ह्यातील आदिवासी किशोरवयीन मुले, मुली महाराष्ट्र शासनाचे अ‍ॅम्बेसॅडर म्हणून नक्षल प्रभावित क्षेत्रात बदल घडवतील, असा आशावाद पोलीस विभागाने व्यक्त केला आहे.मंगळवारी गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातून रवाना करण्यात आलेल्या सहलीमध्ये ८२ मुला, मुलींचा समावेश आहे. यामध्ये दुर्गम आदिवासी भागातील मुलांसह नक्षल पीडित, नक्षल कुटुंबियातील पाल्यांचाही सहभाग आहे. शिवाय पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय अधिकाºयांचे पथकही समाविष्ट आहे. सर्व मिळून एकूण ९१ जणांची सहल गडचिरोली येथून रवाना करण्यात आली आहे.सहल रवाना करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सहलीत सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आदर्श नागरिक बनणार, असा आशावाद मुला, मुलींनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत दिवटे यांनी केले.सदर सहलीतील विद्यार्थी नागपूर, पुणे व इतर मोठ्या शहरांना भेटी देणार असून शहरी भागात झालेली शैक्षणिक प्रगती, आर्थिक, सामाजिक विकासाची माहिती जाणून घेणार आहेत. शिवाय शहरी भागातील रूढी, परंपरा, संस्कृतीचा अभ्यास करणार आहेत.