शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

पोलिसांच्या मध्यस्थीने वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

By admin | Updated: September 18, 2015 01:13 IST

वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण व कार्यालयाची झालेली तोडफोड प्रकरणी बुधवारपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते.

राजकीय नेते व नागरिकांचा दबाव : दोन दिवसांपासून खडित होता आरमोरी तालुक्याचा वीज पुरवठाआरमोरी : वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण व कार्यालयाची झालेली तोडफोड प्रकरणी बुधवारपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणात अखेरीस गुरूवारी आरमोरी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वीज कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र यासाठी राजकीय नेते व नागरिकांनी मोठा दबाव त्यांच्यावर टाकला. आरमोरी तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. ग्रामीण भागात चार-चार दिवस वीज पुरवठा बंद राहतो. १३ सप्टेंबरला काही नागरिकांनी आरमोरी येथील वीज उपकेंद्राच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी अज्ञात नागरिकांनी दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. रात्री कर्मचारी यंत्रचालक यांनी पोलीस ठाणे गाठून अज्ञात नागरिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कारवाई न झाल्याने १६ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून आरमोरी तालुक्याचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला होता. गुरूवारी सकाळी आरमोरी पोलिसांनी या प्रकरणात ठाणेगाव येथील सहा नागरिकांना ताब्यात घेतले. ही वार्ता आरमोरी शहरात पसरताच वीज पुरवठा बंद असल्याने संतापलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार सुभाष ढवळे यांनी या संदर्भात गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवळे यांना याची माहिती दिली. त्यानंतर डॉ. कवडे व आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरिष मने, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, राजू अंबानी, भारीप बहुजन महासंघाचे हंसराज बडोले, संदीप ठाकूर, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता म्हस्के, उपविभागीय अभियंता आढाव, वीज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नाकतोडे, अडकिने यांच्यासोबत पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यावेळी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी महावितरणाचे कर्मचारी ताठर भूमिका घेत असेल तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करा, अशी बाजू मांडली. कर्मचाऱ्यांचा संप हा बेकायदेशीर असल्याचे राजकीय नेत्यांनी यावेळी सांगितले.याचवेळी सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या ठाणेगावच्या सहा युवकांना सोडून देण्यात आले. याप्रसंगी पोलीस ठाण्यात हैदरभाई पंजवानी, नंदू पेट्टेवार, भारत बावणथडे, अनिल सोमनकर, भिमराव ढवळे, सदानंद कुथे, पंकज खरवडे, विलास दाणे, विनोद बेहरे, नंदू नाकतोडे, नितीन जोध, मिलिंद खोब्रागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)