शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पोलिसांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:43 IST

शेतकऱ्यांना प्रगत शेतीच्या दिशेने घेऊन जाण्याकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने बामणी पोलीस स्टेशनच्या परिसरात १५ हजार पपई रोपांची रोपवाटिका ...

शेतकऱ्यांना प्रगत शेतीच्या दिशेने घेऊन जाण्याकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने बामणी पोलीस स्टेशनच्या परिसरात १५ हजार पपई रोपांची रोपवाटिका तयार करण्यात आली. दि.२२ ला बामणी येथे पपई लागवड प्रशिक्षण व रोपे वाटप मेळावा पार पाडण्यात आला.

सुरुवातीला पोलीस अधीक्षक गोयल यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक मदन मस्के (प्रभारी अधिकारी, बामणी) यांनी लिहिलेल्या पपई लागवड पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडीअडचणी समजून घेऊन कृषी विभागाच्या विविध योजना व कृषी तंत्रज्ञान तसेच पपई लागवडीबाबत तालुका कृषी अधिकारी सिरोंचा मदन मेश्राम पं.स. सिरोंचाचे कृषी अधिकारी एस.डी. कोपनार यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस अधीक्षकांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रत्येकी ३० पपई रोपे, गांडूळ खत व पपई लागवडीबाबतच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. १० महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा राहुल गायकवाड, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, प्रगतिशील शेतकरी रवी कारसपल्ली, उपपोस्टे ब्रामणीचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, तसेच अहेरी, जिमलगट्टा उपविभागातील २०० ते २५० शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी उपपोस्टे बामणीचे प्रभारी अधिकारी सपोनि मदन मस्के, पो.उपनिरीक्षक दीपक पारधे, संभाजी मुंडे, उदय पाटील व अंमलदार आदींनी सहकार्य केले.

(बॉक्स)

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा प्रयत्न

शेती हे केवळ उपजीविकेचे साधन न राहता आर्थिक उत्पन्नवाढीचा स्रोत बनावी यासाठी शेतकरी बांधवांना नवीन पीक पद्धतीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, तसेच रोपे वाटप करून कृषीविषयक जागृती आणण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. यापूर्वी कृषी समृद्धी योजनेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर पेरमिली पो.स्टे.मार्फत जिल्हाभरातील होतकरू व गरजू शेतकऱ्यांना १५ हजार शेवगा रोपे वाटप करण्यात आली होती. राजाराम (खां.) पोलिसांच्या वतीने १५ हजार सीताफळ रोपांची रोप वाटिका तयार केली असून ती रोपेही शेतकऱ्यांना लागवडीकरिता वाटप केली जाणार आहेत, असे यावेळी पो. अधीक्षक अंकित गोयल म्हणाले.