शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पित नक्षलवाद्याच्या भावाला दिले पोलीस जवानाने रक्त

By admin | Updated: August 5, 2015 01:36 IST

जंगलात समोरासमोर उभे ठाकल्यावर नक्षलवादी व पोलिसांनी एकमेकांचे रक्त सांडविल्याच्या घटना आपण नेहमीच वाचतो.

गडचिरोली : जंगलात समोरासमोर उभे ठाकल्यावर नक्षलवादी व पोलिसांनी एकमेकांचे रक्त सांडविल्याच्या घटना आपण नेहमीच वाचतो. परंतु येथे मात्र पोलिसांनी रक्तदान करुन एका आत्मसमर्पित नक्षल्याच्या भावाचा जीव वाचविला आहे.भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलीस ठाण्यांतर्गत मुरंगल येथील रहिवासी रामजी कोलू मज्जी या नक्षल दलम सदस्याने २०१४ मध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. काही दिवसांपूर्वी रामजीचा भाऊ दलसू मज्जी याच्या उजव्या हाताला जखम झाली. दलसूने त्यावर प्रथमोपचार केला. मात्र ती दुरुस्त झाली नाही. उलट जखमेचे ट्यूमरमध्ये रुपांतर झाले. अशातच लाहेरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी जनसंपर्क बैठक आयोजित केली होती. या बैठकीदरम्यान दलसूला जखम झाल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दलसूला स्वखर्चाने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. येथील डॉक्टरांनी त्याच्या ट्यूमरची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. परंतु परिस्थिती गरिबीची असल्याने पैशाची तजवीज होणे शक्य नव्हते. त्यामुळे दलसूने लाहेरी उपपोलीस ठाण्याशी संपर्क करून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आर्थिक मदत मिळू शकते का, अशी विचारणा केली. त्यावर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्रकृतीविषयी सर्व माहिती घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ही प्रक्रिया सुरू असतानाच रविवारी दलसूची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तत्काळ रक्ताची आवश्यकता असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विचार न करता रक्तदान केले. यामुळे दलसूचे प्राण वाचले आणि त्याच्या जीवनात आनंद फुलला. (शहर प्रतिनिधी)