शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारात पोलीस विभाग अव्वल

By admin | Updated: August 9, 2015 01:26 IST

भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचे स्वरूप देण्यात जिल्ह्याचा पोलीस विभाग आघाडीवर असल्याचे गेल्या आठ महिन्यात एसीबीने केलेल्या कारवाईत दिसून आले.

९५ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त : आठ महिन्यात एसीबीचे १५ सापळेलोकमत विशेषदिलीप दहेलकर  गडचिरोलीभ्रष्टाचाराला शिष्टाचाराचे स्वरूप देण्यात जिल्ह्याचा पोलीस विभाग आघाडीवर असल्याचे गेल्या आठ महिन्यात एसीबीने केलेल्या कारवाईत दिसून आले. १ जानेवारी ते ८ आॅगस्ट २०१५ या कालावधीत गडचिरोलीच्या एसीबीने १५ सापळे रचून एकूण १६ भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. १ जानेवारी ते ८ आॅगस्ट २०१५ या आठ महिन्यांच्या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार एकूण १५ सापळे रचण्यात आले. या आठ महिन्यातील दाखल गुन्हे गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहेत. या कारवाईवरून गडचिरोली जिल्ह्यात भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. भ्रष्टाचार रोखण्याकरिता शासनाच्या वतीने विविध उपाययोजना आखण्यात येत आहे. समाजाला पोखणाऱ्या भ्रष्टाचाररूपी किडीला आळा घालण्याकरिता विविध उपाययोजना केल्या जात आहे, असे असतानाही भ्रष्टाचार वाढत असल्याचे दिसून येते. अशा घटनांबाबत होणाऱ्या कारवाईवरून भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांमध्ये सजगता येत असल्याचे दिसत आहे. यंदा आठ महिन्याच्या कालावधीत झालेल्या कारवाया या नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागृतीची निष्पत्ती आहे. भ्रष्टाचारात गडचिरोली जिल्ह्याचा पोलीस विभाग प्रथम क्रमांकावर असून या विभागातील चार लाचखोर आरोपींवर एसीबीने कारवाई केली आहे. महसूल व वन विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून महसूल विभागाच्या तीन तर वन विभागाच्या तीन लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांवर एसीबीने कारवाई केली आहे. अपसंपदा बाळगल्या प्रकरणी गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या पथकाने लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळत आठ महिन्यांच्या कालावधीत १५ सापळे रचून १६ आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली.१३ लाचखोरांना रंगेहात अटकदिलीप रामभाऊ अलगुनवार (तलाठी विहीरगाव साझा), नेपालचंद्र दिनदयाल मजुमदार (पोलीस उपनिरिक्षक पोलीस ठाणे चामोर्शी), भगिरथ ढिवरूजी भांडेकर (पोलीस पाटील वालसरा), नारायण दिगांबर सोळंखे (वनरक्षक, वनपरिक्षेत्र मार्र्कंडा कं.), अशोक गणपतराव कुंभारे (तलाठी कोटगल साझा), दत्ता मकिंद्रराव भारगवे (वनपरिक्षेत्राधिकारी आसरअल्ली), मिथून सुरेश भोईर (पोलीस उपनिरिक्षक पोलीस ठाणे अहेरी), मनोज झेबाजी मोटघरे (शाखा अभियंता, पं.स. आरमोरी), संजय दादाजी आत्राम (मुख्य लेखापाल वन विभाग कार्यालय भामरागड), दयानंद रघुनाथ नागरे (एएसआय, पोलीस स्टेशन आरमोरी), अरूण एकनाथ पिसे (पोलीस हवालदार, पोलीस चौकी मेंडकी), पितांबर निजबोध सुटे (शिल्प निदेशक आयटीआय) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.