शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी निर्माण केली जनावरांसाठी पाणपोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:39 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच मानवासह प्राण्यांनाही पाणी टंचाईची झळ बसत आहे. पाण्यासाठी जनावरांना वनवन भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देताडगाव जवानांचा उपक्रम : दिवसभर जनावरांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : उन्हाळ्याची चाहूल लागताच मानवासह प्राण्यांनाही पाणी टंचाईची झळ बसत आहे. पाण्यासाठी जनावरांना वनवन भटकावे लागत आहे. ताडगाव पोलीस व सीआरपीएफ जवानांनी गावाजवळ प्राण्यांसाठी पाणपोई तयार केली आहे.भारामगड तालुक्यात पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदी व नाले असले तरी या नदी, नाल्यांवर बंधारे नाही. त्यामुळे पावसाळ्यात पूर येते. पाणी अडविले जात नसल्याने पावसाळा संपताच संपूर्ण पाणी वाहून जाते. त्याचबरोबर लोकसंख्येच्या तुलनेत या भागात विहीर, हातपंप यासारख्या पाण्याच्या स्त्रोतांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. परिणामी पावसाळा संपताच पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागातील नागरिकांना बसण्यास सुरूवात होते. अनेकवेळा हातपंप बंद असल्याची तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेत नाही. याचा परिणाम म्हणजे, पाणी टंचाई आणखी तीव्र होते. याचा फटका दुर्गम भागातील नागरिकांना बसण्याबरोबरच पाळीव जनावरे व वन्यजीवानांही बसतो.पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन पोलीस मदत केंद्रातर्फे गावाजवळच जनावरांना पाणी पिण्यासाठी टाका बांधला आहे. या टाक्यामध्ये दरदिवशी दोनवेळा पाणी टाकले जात आहे.दरदिवशी नियमितपणे पाणी उपलब्ध होत असल्याने गावातील जनावरेही या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत आहेत. परिणामी दिवसभर या परिसरात पाळीव प्राण्यांची गर्दी होत आहे. पोलीस विभागाच्या या उपक्रमाचे गावातील पशुपालकांनी कौतुक केले आहे. सदर उपक्रम इतर पोलीस स्टेशनसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.