गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैनू मासू गोटा व मंगेश होळी यांना एटापल्ली पोलिसांनी अहेरी न्यायालयातून जामीन मिळताच पुन्हा अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.छत्तीसगड राज्याच्या कांकेर भागातील दोन आदिवासी तरूणींवर पोलिसांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आरोप करणारे सैनू गोटा, त्यांच्या पत्नी शीला गोटा, रामदास जराते व मंगेश होळी अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. त्यानंतर एटापल्ली पोलिसांनी सैनू गोटा व मंगेश होळी यांच्या विरोधात एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३६५, ३६४ (अ), १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयातून सुटका होताच अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांकडून सैनू गोटा यांना पुन्हा अटक
By admin | Updated: February 1, 2017 00:48 IST