शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाल पदभरती प्रक्रियेची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 21:45 IST

तालुक्यातील साजा क्रमांक १२ च्या कोतवाल पदभरतीच्या लेखी परीक्षेत आपण प्रथम येऊनही व तोंडी परीक्षेत विचारलेल्या सर्वच प्रश्नांची बिनचूक व अचूक उत्तरे देऊनही आपल्याला तोंडी परीक्षेत कमी गुण देण्यात आले.

ठळक मुद्देपत्रकार परिषद : खिरू भानारकर यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील साजा क्रमांक १२ च्या कोतवाल पदभरतीच्या लेखी परीक्षेत आपण प्रथम येऊनही व तोंडी परीक्षेत विचारलेल्या सर्वच प्रश्नांची बिनचूक व अचूक उत्तरे देऊनही आपल्याला तोंडी परीक्षेत कमी गुण देण्यात आले. कोतवाल निवडीसाठी आपण पात्र असूनही अन्याय करण्यात आला. त्यामुळे कोतवाल पदभरतीला स्थगिती देऊन या प्रक्रियेची चौकशी करावी व आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी कुलकुली येथील खिरूताई भानारकर यांनी शुक्रवारी आरमोरी येथे पत्रकार परिषदेतून केली.भाकरोंडी साजा क्रमांक १२ च्या कोतवाल पदभरतीसाठी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज भरले. १० सप्टेंबरला कोतवाल पदभरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षेत आपल्याला प्रथम क्रमांकाचे गुण मिळाले. १४ सप्टेंबर २०१७ ला आपल्याला तोंडी परीक्षेसाठी पाचारण करण्यात आले. तोंडी परीक्षेत विचारलेल्या सर्व प्रश्नांची बिनचूक उत्तरे दिली. तरी सुद्धा या परीक्षेत हेतुपुरस्सर मला कमी गुण देऊन माझ्यावर अन्याय करण्यात आला. मला कोतवाल निवडीपासून बाद करण्यात आले. ज्या उमेदवाराची निवड झाली, तिचे पती देखील कोतवाल आहेत. सदर कोतवाल भरतीत गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप करीत कोतवाल पदभरती प्रक्रियेला स्थगिती देऊन या प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी खिरूताई भानारकर यांनी पत्रकार परिषदेतून केली. याप्रसंगी अनिल सहारे, रोहिदास सहारे, जगदीश रामटेके उपस्थित होते.