शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडांगणाची निर्मिती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:57 IST

फुटबॉल खेळ हा अतिशय चांगला असून या खेळामुळे व्यायाम होतो व आरोग्य सुदृढ बनते. स्पर्धेच्या अयोजनामुळे सुंदरनगर परिसरातील खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होईल.

ठळक मुद्देसुंदरनगरवासीयांना पालकमंत्र्यांचे आश्वासन : आंतरराज्यीय फुटबॉल स्पर्धा, नागपूरचा संघ विजेता

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : फुटबॉल खेळ हा अतिशय चांगला असून या खेळामुळे व्यायाम होतो व आरोग्य सुदृढ बनते. स्पर्धेच्या अयोजनामुळे सुंदरनगर परिसरातील खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होईल. या भागाच्या विकासासाठी आपण तत्पर असून लवकरच सुंदरनगर येथे क्रीडांगणाची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.सुंदरनगर येथील नेताजी सुभाषचंद्र फुटबॉल कमिटीद्वारे आंतरराज्यीय फुटबॉल स्पर्धा १० ते १५ सप्टेंबर या कालावधीत येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू हकिम, जि.प.सदस्य दीपक हलदार, जि.प .सदस्य रवींद्र शाहा, सरपंच पल्लवी शील, माजी सरपंच रंजीत स्वर्णकार, प्राचार्य रंजीत मंडल, मुख्याध्यापक पी. बी. मंडल, तंमुस अध्यक्ष शैलेंद्र खराती, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता उपस्थित होते. स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी हैद्राबाद व नागपूर यांच्यात खेळविण्यात आला. दोन्ही संघांपैकी एकाही संघाने वेळेत गोल केला नाही. शेवटी पेनाल्टी शॉटमध्ये नागपूर संघाने गोल करून विजय मिळविला. या स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.प्रास्ताविक जि.प.सदस्य रवींद्र शाह यांनी केले. सुंदरनगर येथे दरवर्षी फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाते. येथे राज्य व आंतरराज्यातील संघ खेळण्यासाठी येतात. प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद लाभतो. त्यामुळे फुटबॉलचे क्रीडांगण निर्माण करावे, अशी मागणी त्यांनी केली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.

टॅग्स :Footballफुटबॉलministerमंत्री