शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नाटकबाजी करणाऱ्यांना समाजाच्या व्यथा कळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:18 IST

देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आपल्या सरकारच्या फसव्या प्रसिद्धीचे ढोल वाजविण्यासाठी डॉ.बाबासांहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे नाटक करीत आहे. त्यांना समाजाच्या व्यथा कळतच नाही, अशी टिका करून गोरगरीबांचे उत्थान करण्यासाठी ठोस, कायदेशीर व रचनात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे,....

ठळक मुद्देसुरेश माने यांची टीका : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पर्याय म्हणून समोर येणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आपल्या सरकारच्या फसव्या प्रसिद्धीचे ढोल वाजविण्यासाठी डॉ.बाबासांहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे नाटक करीत आहे. त्यांना समाजाच्या व्यथा कळतच नाही, अशी टिका करून गोरगरीबांचे उत्थान करण्यासाठी ठोस, कायदेशीर व रचनात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे, हे मोदी सरकारने लवकर समजावे, असा इशारा बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीचे (बीआरएसपी) संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश माने यांनी दिला.गडचिरोलीत शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रपरिषदेत अ‍ॅड.माने बोलत होते. यावेळी बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दशरथ मडावी, कैलास नगराळे, विलास कोडापे, मिलिंद बांबोळे, सदाशिव निमगडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी माने म्हणाले, सर्वात जास्त हिंसाचार भाजपच्या राजवटीत दलितांवर झाला आहे. अनेक राज्यात त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणात दलितांवरील गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, पण प्रत्यक्षात काहीच केले नाही. शासनाने किती गुन्हे मागे घेतले याचे आकडे द्यावे, असेही ते म्हणाले. भाजप सरकारने लोकशाही आणि राज्यघटनेवरील हल्ले थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सूरजागड खाण प्रकरणी भाजप नेते आधी एक बोलत होते, आता सत्तेत आल्यावर वेगळी भूमिका घेत आहेत. नेमकी भूमिका कोणती हे त्यांनी स्पष्ट करावे, असे माने म्हणाले.समाजातील कोणताही वर्ग आता भाजपचे समर्थन करायला तयार नाही. त्याचा फटका राज्यात येणाºया निवडणुकांत भाजपला निश्चित बसेल. शिवाय काँग्रेस आणि भाजपच्या धोरणांमध्ये फारसा फरक नाही.त्यामुळे समर्थ पर्याय म्हणून बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी राज्यात विधानसभेच्या अनेक जागा लढवेल, असेही अ‍ॅड. सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सरकारने तेंदूपत्ता संकलन करावेगडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा असणाऱ्या तेंदूपत्ता व्यवसायावर यावर्षी ठेकेदारांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. यामुळे हजारो मजुरांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी करावी आणि सरकारने तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू करावे, अशी मागणी बीआरएसपीचे विदर्भ अध्यक्ष दशरथ मडावी यांनी यावेळी केली.