शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

दीड लाखावर रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:54 IST

शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम घेऊन वृक्ष लागवड केली जाते. यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सामाजिक वनीकरण रोपवाटिका विक्रमपूर व चामोर्शी वन परिक्षेत्रांतर्गत अस्थायी रोपवाटिका सोनापूर यांच्या वतीने १ लाख ६५ हजार ८४० रोपांची लागवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचामोर्शी येथील रोपवाटिका : सामाजिक वनीकरण व वन परिक्षेत्र कार्यालयाचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम घेऊन वृक्ष लागवड केली जाते. यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सामाजिक वनीकरण रोपवाटिका विक्रमपूर व चामोर्शी वन परिक्षेत्रांतर्गत अस्थायी रोपवाटिका सोनापूर यांच्या वतीने १ लाख ६५ हजार ८४० रोपांची लागवड करण्यात आली आहे.शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेसाठी अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी अडीच महिन्यात रोपे लागवडीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रोपांची निगा व पाण्याची व्यवस्था करण्याकरिता ४० मजूर काम करीत आहेत. रोपवाटिकेत विविध जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. विक्रमपूर रोपवाटिकेत १ लाखाच्या वर रोपांची लागवड करण्यात आली असून या रोपांची निगा योग्य प्रकारे राखली जात आहे, अशी माहिती सहायक लागवड अधिकारी वासुदेव घेरकर व वनसेवक माणिक बनिक यांनी दिली. तर अस्थायी रोपवाटिकेत वेगवेगळ्या जातींच्या २८ हजार ४४३ रोपांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती आरएफओ पी. के. लेले, आरओ आर. डी. तोकला यांनी दिली.विविध प्रजातींच्या रोपांचा समावेशसामाजिक वनीकरण रोपवाटिका विक्रमपूर येथे करंजीची १० हजार, सिसव १० हजार, रिअ‍ॅल्ट्री १५ हजार, विरहाफारम १० हजार, गुलमोहर ५ हजार, बहावा २ हजार ५००, कॅसिया २ हजार, जंगली बदाम १ हजार, आंबा २ हजार, जांभुळ ५००, आवळा ५ हजार, डाळींब १२ हजार, वड ५००, पिंपळ २ हजार ५००, बेल २ हजार ५००, कडूनिंब १० हजार ५००, निलगिरी २० हजार, मुंगना ३ हजार, बांबू १० हजार, जांबाची १५ हजार रोपे लागवड केली आहेत. तर सोनापूर येथे बांबूची १९ हजार ८०७, आवळ्याची २ हजार ५१२, बहाव्याची ५५६, चिंचेची ५ हजार २६४, जांभळाची २२४ रोपे लागवड करण्यात आली आहेत. उन्हाळ्यात या रोपांची निगा राखण्याकरिता हिरव्या जाळीची व्यवस्था करण्यात आली असून रोगमुक्तीसाठी विशिष्ट पद्धतीचा वापर केला जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग