शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वी वाचविण्यासाठी वृक्षारोपण यज्ञ

By admin | Updated: June 24, 2017 01:26 IST

वाढत्या औद्योगिकरण व लोकसंख्येमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

खासदारांचे प्रतिपादन : वन विभाग व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे वृक्षदिंडी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : वाढत्या औद्योगिकरण व लोकसंख्येमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सजीव सृष्टीला दीर्घकाळ टिकवायचे असेल तर वृक्ष लागवडीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करून वृक्ष जगवावे, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले. वन विभाग व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वतीने गडचिरोली शहरातून शुक्रवारी सकाळी वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर मुख्य वनसंरक्षक कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार प्रा.अनिल सोले, आ.डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, मुख्य वनसंरक्षक येटबॉन, भाजप महामंत्री रवींद्र ओल्लालवार, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बबली मेश्राम, किशोर पाटील, विजय फडणवीस, प्रशांत कामडी, देवा डेहनकर, नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, एक व्यक्ती एका दिवशी जो आॅक्सिजन घेतो, त्याची किंमत काढली तर ती २५ हजार रूपयांच्या जवळपास आहे. झाडांची संख्या कमी झाली तर आॅक्सिजन विकत घेण्याची पाळी येऊ शकते, आॅक्सिजन मिळाला नाही तर सजीव दोन मिनीटेही जिवंत राहू शकत नाही. आॅक्सिजन पुरवठ्यासाठी झाडे एकमेव पुरवठादार आहेत. त्यामुळे सजीव सृष्टीमध्ये झाडांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येकाने झाडांची लागवड करून ते जगविण्याचा प्रयत्न करणे हे स्वत:चे कर्तव्य मानले पाहिजे. झाड लावून ते जगविण्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न राज्य व केंद्र शासन करीत आहे, असे मार्गदर्शन खा.अशोक नेते यांनी केले. आ.प्रा.अनिल सोले म्हणाले, वृक्षदिंडी विदर्भातील सहा जिल्ह्यात काढली जाणार आहे. आज आपण वृक्षलागवड केली नाही तर येणाऱ्या काळात जीवन जगणे कठीण होऊन जाईल. पूर्वी इंधन व पाणी निसर्गातून सहज मिळत होते. परंतु वेळीच योग्य काळजी घेतली नसल्यामुळे आपल्याला ते आता खरेदी करण्याची पाळी आली आहे, असे ते म्हणाले. आ.डॉ. देवराव होळी यांनी वृक्षदिंडी ही लोकचळवळ असल्याचे सांगून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे हे ईश्वरीय कार्य आहे. शासनामार्फत १ ते ७ जुलै या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात २५ लाख या उद्दिष्ट उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड केली जाणार आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक सुनील पेंदोरकर यांनी केले. कार्यक्रमादरम्यान सर्वांना वृक्ष लागवड व जगविण्याची शपथ दिली. मात्र वनविभागाने यावेळीही प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमापासून दूर ठेवले. वनविभागाने खोदले २५ लाख खड्डे गडचिरोली जिल्ह्याला वृक्षलागवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभाग मागील दोन महिन्यांपासून कामाला लागला आहे. वन विभागाच्या मार्फत जनजागृती केली जात आहे. वृक्षारोपणासाठी वन विभागाने सुमारे २५ लाख खड्डे खोदले आहेत. १ ते ७ जुलै या कालावधीत वृक्षलागवड केली जाईल. जिल्ह्यातील जंगल टिकून राहिले पाहिजे, यासाठी वन विभाग प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक येटबॉन यांनी केले. वृक्ष लागवड करू इच्छिणाऱ्या नागरिक व स्वयंसेवी संस्थांना सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिले जातील, अशीही माहिती मुख्य वनसंरक्षक येटबॉन यांनी कार्यक्रमादरम्यान दिली.