गडचिरोली : गडचिरोली, कुरखेडा, वडसा येथे युवा सेनेच्या वतीने शनिवारी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात शनिवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, राजू कावळे, वासुदेव शेडमाके, शहरप्रमुख संतोष मारगोनवार, नंदू कुमरे, अविनाश जीवतोडे, तेजस नरड, नयन कहाडे, प्रशांत देवगिरवार, रोहित निपाने उपस्थित होते. यावेळी रूग्णांना फळांचे वाटपही करण्यात आले. यावेळी सुरेंद्रसिंह चंदेल यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.कुरखेडा येथे वडसा मार्गावर मोहबंशी यांच्या पेट्रोलपंप परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, जि. प. सदस्य निरांजनी चंदेल, अशोक इंदूरकर, पं. स. उपसभापती बबन बुद्धे, आशिष काळे, अशोक कंगाली, नरेंद्र तिरणकर, रोशन सय्यद, अज्जू सय्यद, पुंडलिक देशमुख, संजय देशमुख, रमेश कुथे, पुरूषोत्तम तिरगम उपस्थित होते. यावेळी कडुलिंब, आवळा, आंबा आदी वृक्षांची लागवड करण्यात आली.वडसा येथे शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला विजय बुल्ले, सिचन वानखेडे, नंदू चावला, विठ्ठल धोटे, बालाजी ठाकरे, विश्वनाथ सहारे, शंकर चांदेवार, जगदीश परसवानी, देवराव बेंदरे, सुनील दुनेदार, दयाराम उरकुडे, विलास बुरांडे, वासुदेव मेश्राम, प्रवीण तुपट, सूरज गजभिये, गुणवंत हेडाऊ आदी उपस्थित होते. यावेळी रुग्णालयात रुग्णांना बिस्किट व फळ याचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन वृक्षारोपण करण्यात आले.
युवा सेनेतर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण
By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST