शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विहारासाठी निधी देणार

By admin | Updated: March 27, 2017 00:52 IST

बुद्धांचे विचार सर्व मनुष्याला शांतीचा मार्ग दाखविणारे व सर्व जगाला तारणारे आहेत. सर्वांनी गौतम बुद्धांचे विचार अंगिकारावे.

अशोक नेते यांचे प्रतिपादन : कढोलीत भगवान बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरणकुरखेडा : बुद्धांचे विचार सर्व मनुष्याला शांतीचा मार्ग दाखविणारे व सर्व जगाला तारणारे आहेत. सर्वांनी गौतम बुद्धांचे विचार अंगिकारावे. कढोली गावाच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीची मागणी नागरिकांनी करावी. बौद्ध विहारासाठी पाच लाख रूपयांचा निधी देण्याची घोषणा खा. अशोक नेते यांनी केली. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे रविवारी वॉर्ड क्रमांक १- जयभीम पँथर यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे अनावरण खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रोहिदास राऊत, विजय बन्सोड, हंसराज बडोले, डी. के. मेश्राम, कृष्णा चौधरी, जावेद अली, चंद्रकांत चौके, दमयंती सहारे, माधुरी मडावी, लक्ष्मण नंदनवार, अनिल कोटांगले, मेघाजी सहारे, महादेव सहारे आदी मान्यवर उपस्थित होते. जगात अशांतता पसरली आहे. अशा या अशांत जगाला शांत करण्यासाठी गौतम बुद्धांचे विचार अत्यंत मौलिक ठरणार आहेत. गौतम बुद्धांच्या विचार प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रोहिदास राऊत यांनी केले. कार्यक्रमादरम्यान विजय बन्सोड व इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)