शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आराखडा तयार मात्र बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:40 IST

उन्हाळ्यात निर्माण होणारी वैरागड येथील पाणी टंचाई निवारण्यासाठी राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत गोरजाई डोहावर नळ योजना प्रस्तावित असून....

ठळक मुद्देग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : वाढत्या लोकसंख्येच्या वैरागडात उन्हाळ्यात जाणवते टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : उन्हाळ्यात निर्माण होणारी वैरागड येथील पाणी टंचाई निवारण्यासाठी राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत गोरजाई डोहावर नळ योजना प्रस्तावित असून या नळ योजनेचा प्रारूप आराखडा तयार झाला आहे. मात्र मागील चार वर्षांपासून नळ योजनेचा मुहूर्त सापडत नसल्याने सदर योजना कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वैरागड येथे ७५ हजार लिटर क्षमतेची जुनी पाणी पुरवठा योजना आहे. गावाची वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा वाढता वापर लक्षात घेऊन गोरजाई डोहावर पाणी पुरवठा योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी होत होती. मात्र जुन्याच पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर गावाच्या मध्यभागी भोयर यांच्या घराजवळ १५ हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी बांधण्यात आली. मात्र गावातील अर्ध्या अधिक नळधारकांना पाणी मिळत नाही. फेब्रुवारी महिन्यापासून गावात पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली आहे.राष्टÑीय ग्रामीण जल योजना कार्यक्रमांतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना ग्रामसभेत मंजूर करण्यात आली. यात विहीर खोलीकरण, पंप दुरूस्ती, नवीन पाणी पुरवठा विहीर, फिल्टर, गोरजाई डोहावर नवीन पंप, नवीन गृह पाईपलाईन यांचा समावेश आहे. योजनेच्या अधिकाºयांनी जागेसाठी अनेकदा सर्वे केला. मात्र येथील स्थानिक प्रशासनाकडून या कामासाठी पाठपुरावा होत नसल्याने नळ योजनेचे काम थंडबस्त्यात आहे. अगदी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर थातूरमातूर उपाययोजना केली जाते. मागील वर्षी केवळ खड्डा तयार करण्यासाठी एक लाख रूपयांचा खर्च केला होता. मात्र या खड्ड्याचा उपयोग झाला नाही.आमदारांचे आश्वासन हवेत विरलेआमदार कृष्णा गजबे यांनी १६ एप्रिल रोजी ग्रामपंचायत सभागृहात बैठक घेऊन वैरागड येथील पाणी टंचाईवर चर्चा केली आणि गोरजाई डोहावरील नळ योजनेचे काम लवकरात लवकर सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र सदर आश्वासन हवेतच विरले. वैरागडच्या या नळ योजनेच्या प्रश्नाकडे तालुका, जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.