५० लाखांची विकास कामे : घारगावचा नियोजनबद्ध विकासाचा प्रयत्न चामोर्शी : तालुक्यातील घारगाव येथील नागरिकांनी गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी स्वत:च विकास आराखडा तयार केला आहे. ५० लाख रूपयांच्या विकास योजनांचा समावेश असलेल्या या आराखड्यास ग्रामसभेने मंजुरी दिली आहे. राज्य व केंद्र शासनाकडून ग्रामपंचायतीला लाखो रूपयांचा निधी प्राप्त होते. या निधीचा सदुपयोग होण्यासाठी विकास आराखडा अत्यंत गरजेचे आहे. गावातील नागरिक व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण गाव तसेच परिसर फिरून विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात ५० लाख रूपयांच्या विकास योजनांचा समावेश आहे. ग्रामसभेत या विकास आराखड्याला मंजुरी प्रदान करण्यात आली. यावेळी गुणाजी आभारे, पं. स. सदस्य प्रमोद भगत, सरपंच सुषमा आभारे, उपसरपंच नामदेव झलके, सदस्य बंडू भगत, मारोती पोटे, विनायक आभारे, पोलीस पाटील टेमाजी आभारे, विठ्ठल आभारे, भैय्याजी मंगर, गिरीधर आभारे, कबीर आभारे, खेमदेव आभारे, लोमेश भगत, प्रशांत आभारे, ग्रामसेवक प्रवीण चिंतलवार उपस्थित होते. तंमुस अध्यक्षपदी अतुल आभारे यांची निवड झाली. (शहर प्रतिनिधी)
गावकऱ्यांनी तयार केला आराखडा
By admin | Updated: August 20, 2016 01:27 IST